आम्ही पैज लावू शकतो... ही अशी मॅच तुम्ही कधीही पाहिली नसेल......पाहा व्हीडिओ
तुम्ही मोठ मोठ्या खेळाडूंना बास्केट बॉल आणि फुटबॉल खेळताना पाहिले असणार. ते अगदी चपळाइने खेळतात आणि आपला बेस्ट खेळ दाखवतात.
मुंबई : तुम्ही मोठ मोठ्या खेळाडूंना बास्केट बॉल आणि फुटबॉल खेळताना पाहिले असणार. ते अगदी चपळाइने खेळतात आणि आपला बेस्ट खेळ दाखवतात. त्यात जर आपला कोणता आवडता खेळाडू मॅच खेळत असेल, तर आपण अगदी मंत्र मुग्ध होऊन पाहातो. त्याचप्रमाणे प्राण्यांना देखील खेळताना तुम्ही पाहिले असणार. कुत्रा, मांजरालाही तुम्ही बॉलने घरी खेळातात पाहिले असणार, माणसं त्यांना ट्रेन करतात म्हणून मग ते इतके छान खेळू शकतात. त्यांना माणसांची भाषा समजते. परंतु तुम्ही कधी पक्षांना बास्केटबॉल खेळताना पाहिले आहे का? ते ही अगदी अचूक....
तुम्हाला कदाचित पक्षी बास्केटबॉल खेळत आहे हे ऐकून इतके नवल वाटणार नाही, परंतु तुम्हीजर का हा व्हीडिओ पाहिलात तर तुम्हाला समजेल की, त्यात काय आश्चर्यकारक आहे ते. हा एक व्हीडिओ तुमचा दिवस बनवू शकतो.
या व्हीडिओमध्ये पक्षांचे दोन गट आहेत. जसे कोणत्याही खेळात किंवा बास्केटबॉलमध्ये असतात. यांच्यामध्ये एक हिरव्या पक्षांची टीम आणि एक पिवळ्या पक्षांची टीम. दोन्ही टीममध्ये प्रत्येकी 3 खेळाडू आहेत. तुम्हाला हे पाहून आश्चर्य वाटेल की, त्या सगळ्या पक्षांना आपली टीम कोणती आहे हे माहित आहे आणि आपल्याला कोणत्या बाजूच्या बास्केटमध्ये बॉल टाकायचा आहे हे देखील माहित आहे. या पक्षांच्या समोर बॉल टाकताच हे पक्षी त्या बॉलवर तुटून पडतात आणि आपआपल्या बास्केटमध्ये बॉल टाकायला ते पुढे सरसावतात. एवढेच काय तर ते एखाद्या मोठ्या खेळाडू प्रमाणे स्वत:ची ट्रिक वापरुन समोरच्या खेळाडुकडून बॉल हिस्कावतात.
आहे ना मजेदार हा व्ही़डिओ? प्राण्यांना शिकवणे तसे सोपे असते. परंतु पक्षांना ही ट्रेनिंग कशी दिली असणार हेच आश्चर्य वाटण्यासारखे आहे.
हा व्हीडिओ ट्विटरवर नेचर अँड अॅनिमलज नावाच्या अकाउंटवरुन शेअर केला गेला आहे. लोकांकडून हा व्हीडिओ सोशल मीडियावर खूपच पसंत केला जात आहे. लोकं हे केवळ शेअरच करत नाही आहे. तर त्यावर ते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत. आतापर्यंत 7 लाखांहून अधिक लोकांनी ही 59 सेकंदाची व्हीडिओ क्लिप पाहिली आहेत. त्यात बहुतेक लोकांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी पक्ष्यांना प्रथमच बास्केटबॉल खेळताना पाहिले आहे.