Viral Video: उज्जैनच्या (Ujjain) महाकालेश्वर मंदिरातील (Mahakaleshwar Temple) पुजाऱ्याच्या 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. उज्जैनमध्ये संपूर्ण शहर रंगपंचमी साजरी करत रंगांची उधळण करत असताना, महाकालेश्वर मंदिरातही सेलिब्रेशन सुरु होतं. या सेलिब्रेशनमध्ये पुजारी मंगेश गुरु यांचा मुलगा मयांकही सहभागी झाला होता. पण यानंतर मात्र त्याला आपला जीव गमवावा लागला. नेमकं असं काय झालं हे जाणून घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मयांक महाकालेश्वर मंदिरातील कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने हातात तलावर घेत उपस्थितांना आपलं कौशल्य दाखवलं. त्याची तलवारबाजी पाहण्यासाठी चांगलीच गर्दी जमली होती. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंगेशला तलवारबाजी करताना थोडीशी भीती वाटू लागली. त्याची तब्येत सकाळपासूनच चांगली नव्हती.


भीती वाटू लागल्याने मयांक ज्यूस प्यायला आणि पुन्हा एकदा मंदिरातील कार्यक्रमात सहभागी झाला. पण काही वेळाने त्याची प्रकृती बिघडली आणि त्याने आपलं घर गाठलं. काही वेळ आराम केल्यानंतरही त्याला बरं वाटत नव्हतं. यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टर त्याची तपासणी करत असतानाच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांना सायलेंट हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली आहे. 



मयांकचा अचानक मृत्यू झाल्याने महाकाल मंदिरातील पुजाऱ्यांना धक्का बसला आहे. मयांक फक्त 17 वर्षाचा असल्याने त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. 


उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात 6 मार्चला होळीचं दहन करण्यात आलं. मंदिराच्या प्रांगणात देशातील पहिली होळी जाळण्यात आली. संध्याकाळच्या आरतीनंतर भक्तांनी गुलालाने होळी खेळली.