सध्याच्या रीलच्या जमान्यात अनेकदा स्वत:सह दुसऱ्याचाही जीव धोक्यात घातला जातो. एखादा रील बनवून आपणही सोशल मीडियावर व्हायरल व्हावं असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पण या रील्समुळे अनेकदा आपल्या मुलभूत जबाबदाऱ्यांकडेही दुर्लक्ष होतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी नाराजी व्यक्त करत असून, महिलेला खडेबोल सुनावत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

29 सेकंदाच्या या व्हिडीओत दिसत आहे की, महिला हायवेवर रस्त्याशेजारी रील शूट करत आहे. रील शूट करण्यासाठी तिने जमिनीवर कॅमेरा ठेवलेला होता. यावेळी तिच्या दुसऱ्या हातातही कॅमेरा दिसत आहे. सेल्फी मोडमध्ये कॅमेरा ठेवून ती डान्स करत होती. यादरम्यान सफेद रंगाचं जॅकेट घातलेली तिची लहान मुलगी हायवेच्या दिशेने जाताना दिसत आहे. याचवेळी काळ्या रंगाचं जॅकेट घातलेला एक मुलगा तिथे येतो आणि तिला मुलगी हायवेकडे जात असल्याचा इशारा करतो. पण यानंतर महिला मुलीकडे लक्ष न देता, मुलालाच कॅमेऱ्यात पाहण्यास सांगते. नंतर जेव्हा ती मागे वळून पाहते तेव्हा मुलगी हायवेच्या दिशेने जात असल्याचं पाहून धाव घेते. 



हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यानंतर नेटकरी या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत. खराब पॅरेटिंगचं हे उत्तम उदाहरण असल्याचं एका युजरने म्हटलं आहे. या महिलेवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होते. अनेकांनी आपण इतकी बेजबाबदार आई पाहिलं नसल्याचं म्हटलं आहे. 


व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी महिलेच्या बेजबाबदारपणावर टीका केली आहे. अनेकांनी रील संस्कृतीवर टीका केली आहे. रीलच्या नादात अनेक लोक आपल्या जबाबदाऱ्या विसरतात, ते आपल्या मुलांचीही चिंता करत नाहीत असं एकाने म्हटलं आहे. तर एका युजरने कमेंट केली आहे की, 'नशीब हे भारतात झालं आहे. जर अमेरिकेत झालं असतं तर या बेजबाबदारपणासाठी सरकारने पालकत्व हक्कं काढून घेतला असता'. एकाने तर या महिलेला जेलमध्ये टाकलं पाहिजे असा संताप व्यक्त केला आहे.