Viral Video: सोशल मीडियाच्या (Social Media) या जमान्यात आपलाही एखादा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी मग इतरांपेक्षा काहीतरी हटके करण्याचे प्रयत्न सुरु होतात. पण अनेकदा या प्रयत्नांमध्ये आपला जीव धोक्यात घातला जातो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. कारण या व्हिडीओत रिल (Reel) बनवण्यासाठी चालकाने हातातलं स्टेअरिंग सोडून दिलेलं आहे आणि पत्नीसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. या व्हिडीओवरुन अनेकांनी खडे बोल सुनावले आहेत. राजस्थानामधील (Rajasthan) सवाई माधोपूर पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेतली आहे. 


व्हिडीओत नेमकं काय आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओत चालक Mahindra XUV700 चालवताना दिसत आहे.  यावेळी त्याने गाडी अॅडव्हान्स ड्राइवर असिस्टेंस सिस्टम (ADAS) मोडवर टाकलेली आहे. दुर्घटना कमी करण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाचा चालक मात्र गैरवापर करत असल्याचं दिसत आहे. कारण गाडी ADAS मोडवर टाकल्यानंतर चालक निवांत बसलेला दिसत असून आपल्या पत्नीसह चाळे करत आहे. 


कधी तो पत्नीशी चाळे करत आहे, तर कधी आपले दोन्ही पाय तिच्या सीटवर टाकून बसत आहे. हे सर्व करताना त्याचं रस्त्यावर अजिबात लक्ष नसतं. मागील सीटवर बसलेली ही व्यक्ती मोबाइलवर हा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे. व्हिडीओ रेकॉर्ड होत असताना मागे सलमान खानच्या दबंग चित्रपटातील 'सुरीली आंखियो वाले' गाणं वाजत असल्याचं ऐकू येत आहे. 



इन्स्टाग्रामवर अफसर घुड़ासी (afsar_ghudasi44) या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. ट्विटरला एका युजरने ही रील शेअर करत संताप व्यक्त केला आहे. "ऑटोमोबाइलशी संबंधित इतका विचित्र आणि मूर्ख प्रकार तुम्ही याआधी पाहिला नसेल. फक्त रील बनवण्यासाठी. अशा लोकांसोबत आपल्या रस्ता शेअर करावा लागतो हे किती हास्यास्पद आहे. हा मूर्खपणा आहे," असं त्याने म्हटलं आहे. 



दरम्यान एका युजरने आपल्याकडे पुढारलेल्या तंत्रज्ञानाचा गैरवापर होत असून मस्करी सुरु आहे असा संताप व्यक्त केला आहे. तर एका युजरने चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 


ADAS फिचर नेमकं कसं काम करतं?


ADAS (Advanced Driver Assistance System) फिचरचा मुख्य उद्दिष्ट अपघात कमी करणं आहे. हे रडारवर आधारित तंत्रज्ञान आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवत हे फिचर स्वत: कारला नियंत्रित करतं, ज्यामुळे अपघात टाळला जाऊ शकतो. Mahindra XUV700 मध्ये हे फिचर उपलब्ध आहे. भारतामध्ये हे फिचर कितपत यशस्वी ठरेल याबाबत शंका आहे.