हा कसला मूर्खाचा बाजार! महिलेने कपाळावर कोरलं पतीचं नाव; Viral Video पाहून डोक्याला लावाल हात
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत महिला आपल्या कपाळावर चक्क पतीचं नाव कोरुन (Tattoo) घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी हे खरं प्रेम असल्याची उपमा दिली असून, तर काहींना मात्र हा मूर्खपणा असल्याचं सांगत टीका केली आहे.
Viral Video: प्रेम आंधळं असं म्हणतात...याचं कारण प्रेमात समोरील व्यक्तीवर आपण आंधळ्या डोळ्यांनी विश्वास ठेवत असतो. याच प्रेमात अनेकदा मर्यादा ओलांडत समोरील व्यक्तीवर असणारं आपलं प्रेम व्यक्त केलं जातं. पण हे प्रेम व्यक्त करत असताना आपण मूर्खपणा तर करत नाही आहोत ना, याचंही भान असणं गरजेचं असतं. अन्यथा आपण काहीतरी वेगळं करण्याच्या नादात जगासमोर आपली फजिती करत असतो. असाच काहीसा प्रकार बंगळुरुत (Bengaluru) घडला आहे. येथे एका महिलेने चक्क आपल्या कपाळावर पतीचं नाव कोरलं आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला असून, यावर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
प्रेमात जोडीदार एकमेकांच्या नावाचा टॅटू अंगावर गोदून घेणं यात काही नवीन नाही. शरिराच्या वेगवेगळ्या भागावर हे नाव कोरलं जात असतं. पण जर तुम्हाला एखाद्याने कपाळावर तुमच्या जोडीदाराचं नाव कोरलं तर काय प्रतिक्रिया असेल...तुम्ही नक्कीच समोरच्याला वेड्यात काढाला. पण बंगळुरुत चक्क एका महिलेने असा प्रकार केला आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी हा काय मूर्खपणा आहे म्हणच तिच्यावर टीका केली आहे.
ही महिला बंगलुरुची रहिवासी आहे. इन्स्टाग्रामला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्यापासून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. व्हिडीओत महिला खुर्चीवर बसल्याचं दिसत आहे. यावेळी टॅटू आर्टिस्ट महिलेच्या कपाळावर सतीश नाव लिहित असल्याचं दिसत आहे. सतीश हे या महिलेच्या पतीचं नाव आहे.
सर्वात आधी टॅटू आर्टिस्ट कागदावर महिलेच्या पतीचं नाव लिहितो. यानंतर तो ते नाव महिलेच्या कपाळावर चिकटवतो. नंतर मशीनच्या सहाय्याने तो टॅटू बनवतो. यादरम्यान महिला घाबरुन त्याला थांबवण्याचाही प्रयत्न करते. व्हिडीओ शेअर करताना महिलेने 'टू लव्ह' म्हणजेच खरं प्रेम असं लिहिलं आहे.
हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर लाख लोकांनी त्याला लाईक केलं आहे. 1 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओवर कमेंट करत एका युजरने हेच खरं प्रेम असल्याचं म्हटलं आहे. तर काही युजर्सने, हे दुसरं काही नाही तर मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. खरं प्रेम सिद्ध करण्याची गरज नसते. तुम्ही काळजी घेत, प्रेम आणि प्राथमिकतेच्या माध्यमातूनही एखाद्याला हे दाखवू शकता असं युजरने म्हटलं आहे. तर एका युजरने आपलं खरं प्रेम सिद्ध करण्यासाठी असा मूर्खपणा करु नका असा सल्ला दिला आहे.