मुंबई : सोशल मीडियावर अनेकदा काहीतरी अनोखी गोष्ट व्हायरल होते, जी देशात आणि जगात खूप चर्चेत येते. सोशल मीडिया एक असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे तुम्हाला भरपूर कंटेन्ट मिळत असतं. यामध्ये फोटो, व्हिडीओ आणि मीम्स देखील असतात. जे पाहून आपलं मनोरंजन होतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु तो व्हिडीओ खूप मनोरंजन देखील आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूज चॅनेलमधील लाईव्ह शो दरम्यान अनेकदा असे काही घडते, ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने ट्रेंड होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल.


व्हिडीओमध्ये एक अँकर लाइव्ह टीव्हीचे अँकरिंग करताना दिसत आहे, मात्र त्यानंतर त्याचा लहान मुलगा त्याच्या मागून येतो आणि चालू कॅमेऱ्यासमोर असे कृत्य करू लागतो की तुम्ही ते पाहून तुमचं हसू रोखू शकणाकर नाही.


व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की लाइव्ह टीव्हीवर एक न्यूज चॅनल वरती एक व्यक्ती अँकरींग करत आहे. तो कोणत्यातरी मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया देत आहे, तेवढ्यात त्याचा लहान मुलगा मागे येतो आणि मस्ती करायला लागतो.


यामध्ये कधी तो लहान मुलगा उडी मारतो, तर कधी तो सर्व प्रकारचे मजेदार चेहरे बनवू लागतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.



हा मजेदार व्हिडीओ लोकांकडून खूप पसंत केला जात आहे. या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, 'हा मुलगा किती गोंडस आहे.' तर दुसऱ्याने लिहिले, 'हे सर्व वर्क फ्रॉम होमचा परिणाम आहे.' दुसऱ्या यूजरने लिहिले, 'हा व्हिडीओ पाहिल्यानंतर माझे हसू थांबत नाही.' हा मजेदार व्हिडिओ @aggichristiane नावाच्या अकाऊंटवर शेअर केला आहे.