मुंबई : सोशल मीडियावर आपण नेहमीच काही ना काही फोटो किंवा व्हिडीओ पाहात असतो ज्यामुळे आपले मनोरंजन देखील होते. आपल्याला सोशल मीडियावरती प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यात सध्या एका सिंहाचा व्हिडीओची सर्वत्र चर्चा सरू आहे. सिंह जंगलाचा राजा आहे. कोणताही प्राणी त्याच्या समोर उभा राहण्याचा विचार देखील करत नाही. पण आज आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत तो थोडा वेगळा आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक कमेंट्सही येत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत की, हा सिंह जंगलाचा राजा असूच शकत नाही.


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता नदीच्या काठावर एक सिंह पाणी पिताना दिसत आहे. जंगलाचा राजा मोठ्या आनंदाने पाणी पीत असतो, तेव्हा कासव सिंहाला न घाबरता त्याच्या तोंडाजवळ जातो, इतक्या जवळ येऊन देखील सिंह कासवाला काहीही करत नाही. उलट सिंह त्या कासवासोबत वाद न घालता तेथून लांब जाण्याचा निर्णय घेतो आणि तेथून निघून जातो.


सिंह इतका सुस्तावला होता की, कावस त्याच्या तोंडाजवळ आला त्याने सिंहा पाणी पिताना थांबवलं देखील, तरी त्याने कासवाला काहीही केलं नाही आणि खरचं हे आश्चर्यकारक आहे.


हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स म्हणत आहेत की हा बनावट सिंह असावा, हा जंगलाचा राजा असूच शकत नाही, हे वागणं एखाद्या राज्याला शोभणारं नाही.


हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन लिहिले आहे. - बूस्टर डोस नंतर असे होते. म्हणजेच, बूस्टर डोस घेतल्यानंतर कोरोना कितीही जवळ आला तरी त्याचा तुमच्यावर परिणाम होणार नाही.



हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटले आहे तसेच लोकांना सिंहाची स्थिती पाहून हसायला देखील येत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. लोकही या मजेदार व्हिडीओवर कमेंट करत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा आवडतो? कमेंट करून सांग