मुंबई : सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे. जेथे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण त्यावर ऍक्टीव्ह असतात. येथे सगळ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे कंटेन्ट पाहायला मिळतात. ज्यामुळे लोकांचे मनोरंजन होते. सोशल मीडियावर टेक, सायन्स, फूड, ट्रॅव्हल, डेकोरेश, फनी असे अनेक प्रकाचे कंटेन्ट किंवा व्हिडीओ उपलब्ध असतात. तुम्ही सोशल मीडियावरती फनी व्हिडीओ देखील पाहिले असतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर कधी कधी विचित्र गोष्टींचाही व्हिडीओ देखील पाहायला मिळतो. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो केवळ मजेदारच नाही तर धक्कादायकही आहे. हा व्हिडीओ तेलंगणामधील एका दुकानातील आहे, जिथे एक मजेदार गोष्ट घडली आहे.


या व्हिडीओ तुम्ही पाहू शकता की, एका दुकानात चार जण बोलत आहेत. परंतु अचानक काही क्षणानंतर एक भरधाव मोटारसायकल दुकानात शिरते आणि थेट दुकानात बोलत असलेल्या लोकांकडे येते. सुदैवाने चारही जण वेळीच समोरून बाजू होतात. ज्यामुळे कोणालाही दुखापत होत नाही. मात्र, धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार दुकानाच्या काउंटरच्या दिशेने वर उडतो आणि जोरात खाली आदळतो. पण काही सेकंदांनी तो उठतो आणि स्वत:च बाहेर जातो.


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ @सूर्या रेड्डी यांच्या पेजवर पाहू शकता. व्हिडीओ शेअर करताना पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बाइकने कपड्याच्या दुकानात भरधाव वेगात प्रवेश केला, दुकानातील लोक घाबरले, व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे #Telangana.'


ही घटना तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील रविचेट्टू मार्केटमधील आहे आणि ही घटना सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या ऑडिओवरून मोटारसायकलचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज बांधला गेला आहे. बाईकवरून पडलेल्या माणसाला काय झाले असे विचारण्यात आले, तेव्हा त्याने माफी मागून ब्रेक निकामी झाल्याचे सांगितले. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे आणि आता घटनेचा तपास सुरू केला आहे.



आम्ही तुम्हाला सांगतो की, हा व्हिडीओ आता अधिकाधिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे, तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत भरपूर लाईक्स आणि कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.