Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. हे व्हिडीओ खिल्ली उडवणारे, डान्स करणारे तसंच एखाद्या विषयावर गांभीर्याने भाष्य करणारे असतात. यात अनेकदा महिलांच्या गाडी चालवण्याची खिल्ली उडवणारे रिल्सही असतात. महिलांना गाडी नीट चालवता येत नाही असा अनेकांचा दावा असतो. मग हा दावा खरा करण्यासाठी अनेकदा व्हिडीओ शेअर करत तो पटवण्याचा प्रयत्न केला जातो. दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमचा संताप होईल. 


काय आहे व्हिडीओत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक तरुणी रस्त्याच्या मधोमध विनाकारण कशाही पद्धतीने दुचाकी चालवताना  दिसत आहे. बाईक वेगात असून तरुणी बेदरकारपणे चालवत असल्याने तिच्यासह इतरांच्या जीवालाही धोका निर्माण करत असते. तरुणी अशीच स्टंटबाजी करत असताना मागील दुचाकीवर एकाने हा व्हिडीओ शूट केला आहे. 


दरम्यान व्हिडीओत काही वेळातच तरुणी कोणतीही पूर्वकल्पना न देता दुचाकी पूर्पणणे डाव्या बाजूला नेते. याचवेळी मागून येणाऱ्या एका बाईकला तरुणीच्या या स्टंटबाजीचा अंदाज नसल्याने येऊन धडक देतो. यानंतर त्या दुचाकीवर असणारे तिघेही रस्त्यावर फरफटत जातात. ज्याप्रकारे ते खाली रस्त्यावर पडतात त्यावरुन त्यांना जबरदस्त मार लागला असल्याचं स्पष्ट आहे. दरम्यान या अपघातानंतरही तरुणी मात्र दुचाकीवरुन पुढे जाताना दिसत आहे. 



हा व्हिडीओ फार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. mcqueen_spee_d नावाच्या Instagram पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला 48 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केली असून तरुणीला सुनावलं आहे.