Viral | या पोरानं खेकड्याला कापायला लावली भेंडी; देशी जुगाड पाहून लोकं चक्रावले
सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक भन्नाट व्हिडिओ वायरल होत आहे
मुंबई : सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक भन्नाट व्हिडिओ वायरल होत आहे. यामध्ये एक खेकडा भेंडीची भाजी कापताना दिसत आहे. ज्यानंतर लोकांनी मजेशीर कमेंट केल्या.
सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे विषय वायरल होत असतात. काही व्हिडिओ देखील कमी वेळात असंख्या लोकांपर्यंत पोहचतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशलमीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने खेकड्याला पकडले आहे. आणि खेकड्याच्या बोटात भेंडी ठेवली. तो खेकडा भेंडीचे तुकडे करतो.
लोकांनी हा व्हिडिओ प्रचंड वायरल केला आहे. या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करीत काही जण म्हणतात की, भाजी कापण्याचा हा देशी जुगाड आहे. तर काही जण म्हणतात किती तेजस्वी लोकं आहेत भारतात!
हा व्हिडिओ be_idiotic नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.