मुंबई : लोकं त्यांच्या पाळीव प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतात, त्यांच्यासाठी ते काहीही करण्यासाठी तयार होतात. अगदी या प्राण्यांना लोकं कपडे, रेन कोर्ट आणि शूज घालू देखील बाहेर फिरायला आणत असल्याचे तुम्ही पाहिले असणार. कारण हे प्राणी प्रेमी मुलांप्रमाणेच प्राण्यांसोबतही वागतात. या पाळीव प्राण्यामध्ये लोकं मुख्यता मांजर किंवा कुत्रा पाळतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर कुत्र्याच्या आरामदायी आणि आलीशान जीवनशैलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जे पाहून तुम्हाला त्या कुत्र्याच्या जीवनशैलीचा आणि त्याच्या नशीबाचे कौतुक वाटेल. हा व्हिडीओ देखील खुप मजेदार आहे.


सोशल मीडिया साइट (Social Media)  ट्विटरवर कुत्र्याचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुत्र्याला फेस्क मास्क लावला आहे. त्याच्या पोटाजवळ त्याने एक खेळणं पकडलं आहे. कुत्रा या व्हिडीओमध्ये खूपच शांत आणि निवांत राहून या सगळ्या गोष्टीचा आनंद लूटत आहे.


खरेतर एका एक महिलेने आपल्या कुत्र्याला स्पा करण्यासाठी आणले आहे, ज्यामुळे या कुत्र्याला खूप आराम मिळत आहे.


हा व्हिडीओ ट्विटरवर Buitengebieden नावाच्या एका आकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक माहिला या कुत्र्याला मालिश करत आहे. त्यानंतर ती महिला त्याचे त्याचे दात साफ करते. या संपूर्ण स्पादरम्यान कुत्र्याला खूप छान वाटले.


तुम्हीज जर पाहिलात तर तो कुत्रा एक क्षणभरदेखील येथून हलला नाही किंवा कोणाला काहीही त्रास देखील दिला नाही. तो तसाच एका जागेवर झोपून राहीला आणि या स्पा चा आनंद घेत आहे.



या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत 1 लाख 69 हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या व्हिडीओवर यूझर्सच्या मिश्रित प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांना कुत्र्याला स्पा देणे हे खूप चांगले आणि आरामदायक वाटत आहे. तर काही लोकं प्राण्याचा खेळ करत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.