निसर्ग नेहमीच आपल्याला आश्चर्यचकित करत असतो. अशीच एक घटना सध्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओत हत्ती अत्यंत शांतपणे आपल्या रस्त्यात उभ्या एका व्यक्तीला बाजूला होण्यास सांगत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हत्ती अजिबात कोणतीही इजा न पोहोचवता व्यक्तीला बाजूला होण्यास सांगत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओत दिसत आहे की, हत्ती मागून चालत येत आहे. यावेळी एक व्यक्ती समोर उभा असतो. त्याला आपल्या मागून हत्ती येत असल्याची कोणतीही कल्पना नसते. हत्ती जेव्हा माणसाच्या जवळ येतो तेव्हा आवाज करुन त्याला बाजूला होण्याचा सिग्नल देतो. यानंतर तो माणूस मागे वळून पाहतो तेव्हा हत्ती पाहून दचकतो आणि तेथून पळत बाजूला जातो. आपण हत्तीच्या मार्गात आलो आहोत याची त्याला अजिबात कल्पना नसते. अनेकांनी हत्तीची रचना आणि विचारशील वर्तन हे वन्यजीवांच्या सौम्यतेचा खरा पुरावा आहे.


@AMAZlNGNATURE ने एक्सवर व्हिडीओ शेअर केला आहे. "हत्ती हळुवारपणे माणसाला आठवण करून देतो की तो मार्गात आहे,” असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 



या व्हिडीओला 5 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून, कमेंटमध्ये तर पाऊस पडला आहे. 


एका यूजरने कमेंट केली आहे की, “मला हत्ती फार आवडतात. खूप सभ्य आणि हुशार. ” दुसऱ्याने लिहिले, “किती सभ्यपणे त्याने सांगितलं. त्याच्या आईने त्याला शिष्टाचार शिकवले आहेत. माणूस असता तर त्याने एकतर त्या व्यक्तीला ढकललं असतं”.


दरम्यान, श्रीलंकेत, राजा नावाचा हत्ती प्रवाशांकडून “कर गोळा करण्याच्या” त्याच्या अनोख्या सवयीमुळे सेलिब्रिटी बनला आहे. वक्तशीरपणासाठी ओळखला जाणारा, 40 वर्षांचा हत्ती बट्टाला-कटारागामा रस्त्याच्या कडेला उभा राहतो आणि जाताना वाहने थांबवतो. त्याची विनंती सोपी आहे की, पुढे जाऊ देण्याच्या बदल्यात मला अन्न द्या.


जेव्हा वाहने थांबतात, तेव्हा राजा आत्मविश्वासाने आपली सोंड पुढे करतो आणि चालकाकडे आपला शेअर मागतो. बरेचदा पुढे-मागे थोडेफार खटके उडतात, पण त्याला त्याचा टोल मिळतो. त्याचा “अन्न कर” निकाली काढल्यानंतरच तो प्रवाशांना पुढे जाण्याची परवानगी देतो. स्थानिकांनाही आता राजाच्या दिनचर्येची सवय झाली आहे.