वायूवेगाने धावणाऱ्या मालगाडीच्या खाली बसली होती चार मुलं, नंतर जे झालं ते पाहून हादरा बसेल
सोशल मीडियावर (Social Media) एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत चार मुलं धावत्या मालगाडीच्या खाली चाकांजवळ बसून प्रवास करताना दिसत आहेत. एका मजुराने मुलांना पाहिल्यानंतर तात्काळ रेल्वे विभागाला याची माहिती दिली. यानंतर रेल्वे थांबवून मुलांना बाहेर काढण्यात आलं.
आपल्या देशात ट्रेन प्रवास करताना लोक अनेकदा जीव धोक्यात टाकत असतात. गर्दीने तुडुंब भरलेल्या ट्रेनमधून प्रवास करताना काहीजण जीवाची काळजीही घेतली नाहीत. कमी तिकीटदरात मोठा पल्ला गाठता येत असल्याने सर्वसामान्य नागरिक ट्रेनने प्रवास करणं पसंत करतात. पण जीव कितपर्यंत धोक्यात घातला जातो, हे दाखवणारा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत चार मुलं धावत्या मालगाडीच्या खाली चाकांजवळ बसून प्रवास करताना दिसत आहेत. झारखंडमध्ये हा प्रकार घडला आहे.
झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे चार लहान मुलं ट्रेनच्या धावत्या मालगाडीच्या खाली चाकांजवळ बसून प्रवास करत होते. ही घटना चक्रधकरपूर रेल्वे मंडळाच्या किरीबुरु ठाणे क्षेत्रातील आहे. एका मजुराने या मुलांना पाहिल्यानंतर प्रकार उघडकीस आला. त्याने मुलं जीव धोक्यात घालत ट्रेनच्या चाकांजवळ बसून प्रवास करत असल्याचं पाहिलं आणि त्याला धक्काच बसला.
मजुराला सुरुवातीला आपण जे पाहतोय त्यावर विश्वासच बसत नव्हता. यानंतर त्याने या मुलांचा व्हिडीओ शूट केला. नंतर मजुराने तात्काळ रेल्वे विभागाला याची माहिती दिली. रेल्वे विभागाचे कर्मचारीही अजिबात वेळ न दवडता तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रेल्वे थांबवून मुलांना बाहेर काढलं. यानंतर त्यांनी मुलांना असा मूर्खपणा केल्याबद्दल खडे बोल सुनावले आणि पुन्हा असं न करण्याची ताकीद दिली.
दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी प्रचंड नाराजी व्यक्त करत आहे. जराशीही चुकी झाली असती तर मोठी दुर्घटना झाली असती असं नेटकरी म्हणत आहेत. मालगाडीच्या खाली बसून प्रवास करणारी ही मुलं सारंडामधील आदिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
या मालगाडीचा वापर सेलच्या किरीबुरु किंवा मेघाहातुबुरु खाणीतून लोहखनिज वाहतूक करण्यासाठी केला जात असण्याची शक्यता आहे. याचदरम्यान चार मुलं धावत्या मालगाडीच्या आत घुसली असावीत अशी शंका आहे. दरम्यान, असा प्रवास तर मुलांनी आपला जीव धोक्यात घातला होता. सुदैवाने त्यांच्यातील कोणालाही काही जखम झाली नाही.