मुंबई : फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन वीक सुरू होणार आहे. या काळात लोकं आपल्या जोडीदाराला काहीतरी सर्प्राइज देत असतात. त्यामुळे आतापासून बरेच कपल कामाला लागले आहेत. परंतु या सगळ्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना कर्नाटकातील एका हॉस्टेलमधील आहे. येथे एक बॉयफ्रेंड एका सुटकेसमधून आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन जाताना गार्डसच्या हाती लागली. ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉईज हॉस्टेलमध्ये मुलींना घेऊन जाण्याची परवानरगी नसल्यामुळे एका बॉयफ्रेंडने एक विचित्र शक्काल लढवली. परंतु त्याचा हा प्लॅन फसलाच.



हा बॉयफ्रेंड एका सुटकेसमध्ये गर्लफ्रेंडला बसवून रुमवरती घेऊन जात होता. परंतु हॉस्टेलच्या गार्डसला कोणीतरी ही माहिती दिली. ज्यामुळे हा मुलगा पकडला गेला. 


अशाप्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सेम घटना घडली. परंतु हे लक्षात घ्या की आता घडलेली घटना आणि हा व्हिडीओ दोन्हीही वेगळ्या आहेत.


हा व्हिडीओ 2019 मध्ये सोशल मीडियावरही पोस्ट करण्यात आला होता. म्हणजेच हा व्हिडीओ नुकत्याच घडलेल्या घटनेशी संबंधित नाही. या विषयावर इतके ट्विट केले गेले की मणिपाल सूटकेस देखील ट्रेंड करू लागला.


काही वापरकर्त्यांनी याला प्रँक म्हटले आहे. तर काही यूजरने म्हणतायत - 'बरं झालं आम्ही योग्य वेळी कॉलेज संपून हॉस्टेलमधून निघालो.' त्याचवेळी आणखी एका यूजरने मजेशीरपणे म्हटले - 'गर्लफ्रेंडला सूटकेसमध्ये फिरायला आवडत असावे.'