viral video of dragon eat deer: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral video) होत असतं , बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video) व्हायरल होतात तर कधी , मजेशीर व्हिडीओ (funny video) व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडले तर मग ते वाऱ्यासारखे झपाट्याने व्हायरल होतात.  लाखो करोडो लोकांकडून हे व्हिडीओ पहिले जातात त्यावर कॉमेंट्स (comments) केल्या जातात आणि व्हिडीओ आवडले तर ते मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा होतात . (viral video of komodo dragon swollow baby deer scarry video on social media )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे आतापर्यंत करोडो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे, सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे.हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.


हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे कळू शकलं  नाहीये.पण  29 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये कोमोडो ड्रॅगन (सरडा) म्हणजे एक प्रकारे घोरपडीची एक प्रजात आहे. त्याने चक्क हरणाच्या  पिल्लावर झडप घातली आणि काहीही कळण्याच्या आधी त्या पिल्लाला खाऊनही टाकलं.


व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, एक महाकाय जीव जमिनीवर सरपटत येतोय, हळू हळू आपल्या सावजाच्या जवळ तो जातो आणि पापणी लावते ना लावते तोच त्याच्यावर झडप घालतो. ही महाकाय घोरपड पाहता पाहता हरणाच्या त्या पिल्लाला गिळून टाकते.


व्हिडीओ पाहताना फार त्रासदायक वाटतं. पण काय करणार शेवटी हा निसर्गाचाच नियम आहे, प्रत्येक प्राण्याची शिकार, अन्न हे निसर्गानेच ठरवून ठेवलं आहे. हा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय आणि आता लोक या व्हिडिओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत.


कसा असतो कोमोडो ड्रॅगन (Komodo dragon)


कोमोडो ड्रॅगनला(comodo dragon) कोमोडो मॉनिटर लिझार्ड(monitor lizard) असेही म्हणतात. कोमोडो (comodo dragon), रिंका, फ्लोरेस, गीली मोटांग आणि गीली दसामी या इंडोनेशियन(indonesia) बेटांवर हे आढळते. 



सरड्यांच्या प्रजातींमध्ये आकाराने ते सर्वात मोठे आहेत. त्यांची लांबी 3.5 मीटर आणि वजन 136 किलो पर्यंत असते, पृथ्वीवरील सर्वात मोठा सारडा म्हणून त्याची गणना केली जाते. (viral video of komodo dragon swollow baby deer scarry video on social media )