मुंबई : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आणि फोटोज व्हायरल होत असतात. कलाकारांपासून ते सामान्यांपर्यंत जी पोस्ट हटके  असेल, तर तो व्हिडिओ किंवा फोटो वेगाने व्हायरल होतो. आणि मोठ्या प्रमाणात लोक असे व्हिडिओ शेअर करताना दिसतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यात सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं मनोरंजन करणारे व्हिडिओ जास्त चर्चेत असतात. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी आपलं टॅलेंट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी  इंटरनेटचा मार्ग निवडला होता. आणि बरेच जण आपलं स्क्रील दाखवत इतरांचं मनोरंजन करत होते. कलाकारांपासून ते कॉमन मॅन याकाळात जणू स्टार बनला होता.


कोरोनाचा हाहाकार अद्याप सुरु आहे. त्यात एका चिमुरडीचा कोरोनाच्या जन्मापासून व्हॅक्सिनपर्यंतचा प्रवास सांगतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.या व्हिडिओत ही मुलगी चीनवर चांगलीच भडकल्याचं दिसून येतंय. त्याच कारण म्हणजे चीननेच भारतात कोरोनाला पाठवलं असं तिचं म्हणणं आहे.



चीनने 2015 मध्येच कोरोनाला जन्म दिलाये असा दावा या चिमुकलीने केलाये . त्यानंतर कोरोनावरील लशीबाबत देखील मोठा खुलासा या मुलीने केलाये. एकीकडे लहान मुलांना या वयात काय कळतं?, असं बोलंल जात असताना, मात्र या मुलीने आपल्या पावरफुल अंदाजाने सगळ्यांची बोलती बंद केली, असंच म्हणावं लागेल.