Viral Video: कोंबडा पकडायला गेला अन् बिबट्याच्या जाळ्यात अडकला; त्यानंतर जे काही झालं...
Viral Video: बिबट्याला (leopard) चारा म्हणून ठेवलेला कोंबडा (rooster) घेण्यासाठी हा माणूस पिंजऱ्यात शिरला अन् बिबट्याऐवजी तोच अडकल्याचं पहायला मिळालं. अधिकाऱ्यांनी सकाळी जाऊन पिंजरा पाहिला तर तिथं माणूस दिसला.
Viral Video: मागील काही वर्षापासून महाराष्ट्रातील नाशिकमध्ये (Nashik News) बिबट्याचा वावर वाढल्याचं पहायला मिळतंय. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये (UP News) देखील बिबट्याने (Leopard) धुमाकूळ घातला आहे. अशातच बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने (Forest Department) फिल्डिंग लावली होती. मात्र, विचित्रच प्रकार पहायला मिळाला आहे. त्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
तर झालं असं की...
बिबट्याने आसपासच्या परिसरात धुमाकूळ घातला होता. बिबट्याला जेलबंद करावं, अशी मागणी केली जात होती. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने आयडिया केली. बिबट्याला चारा म्हणून ठेवलेला कोंबडा ठेवला आणि अधिकारी खाचाखोचा रोवून लपून बसले. त्यावेळी एक व्यक्ती तिथं आला.
पाहा Video -
बिबट्याला चारा म्हणून ठेवलेला कोंबडा घेण्यासाठी हा माणूस पिंजऱ्यात शिरला अन् बिबट्याऐवजी तोच अडकल्याचं पहायला मिळालं. अधिकाऱ्यांनी सकाळी जाऊन पिंजरा पाहिला तर तिथं माणूस दिसला. त्यानंतर काही लोकांनी त्याचा व्हिडिओ शूट केलाय. तर पोलिसांनी लगेच त्याची सुटका देखील केलीये.
अधिकाऱ्यांनी सांगितली संपूर्ण घटना
बिबट्या इकडे-तिकडे फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला. पिंजरा ठरवण्याआधी आम्ही थोडावेळ पँथरचा शोध घेतला. पिंजऱ्यात एक कोंबडा होता. त्या माणसाने आत जाऊन कोंबडी पकडली तेव्हा पिंजरा बंद होता. त्याला लगेच सोडण्यात आलंय, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.