मुंबई : एक जुनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल, 'करावे तसे भरावे' म्हणजेच तुम्ही जे कर्म करता त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळते. त्यामुळेच लोकं म्हणतात की, नेहमी चांगले काम करावे ज्याचे फळ तुम्हाला चांगलेच मिळते. परंतु तुम्ही जर वाईट कर्म करत असाल, तर तुम्हाला त्याचे फळं देखील तसेच मिळते. काही लोकांनी त्यांच्या आयुष्यात या गोष्टीचा अनुभव घेतला असावा, तर ज्या लोकांनी या गोष्टीचा अनुभव घेतला नाही अशा लोकांसाठी एक चांगलं उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळं जागच्या जागी मिळते. हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल की, काळासोबत म्हणीचा होणाऱ्या परिणामांचा देखील वेग वाढला आहे, ज्यामुळे या व्हिडीओमधील व्यक्तीला त्याच्या कर्माच्या काही सेकंदातच फळ मिळालं आहे.


हा व्हिडीओ पाहून कोणतंही चूकीचं काम करणारी व्यक्ती शंभर वेळा विचार करेल. कारण असे म्हटले जाते की कोणालाही अनावश्यकपणे त्रास देऊ नये किंवा अत्याचार करू नये. कारण, कधीकधी त्याचे परिणाम इतके घातक असतात की, आपण कल्पनाही करू शकत नाही.


व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस झाडावर सतत लाथ मारत होता. त्या व्यक्तीकडे पाहून असे वाटते की, जणू तो झाडावर उंच किक मारण्याचा सराव करत असावा. शेवटी हा व्यक्ती खूप जोरात झाडाला लाथ मारतो आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, ते झाड तुटून त्या व्यक्तीवरतीच पडतो.


लगेच कर्माचे फळ मिळालेल्या या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती केली जात आहे. यावर कमेंट करताना, एका यूजरने लिहिले, 'कर्माचे फळ परत मिळते'. तर दुसऱ्या यूजरने लिहिले, 'त्या वरच्याचं तुमच्या प्रत्येक कृतीवर लक्ष असते, मग ते चांगले असो वा वाईट, प्रत्येक गोष्टीचे फळ त्याला मिळतो.' याशिवाय. दुसरा यूजरने लिहिले, 'वन देवतेने याला चांगला धडा शिकवला.'



हा मजेदार व्हिडीओ ट्विटरवर होल्ड माय बेअर नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत त्याने एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. ही बातमी लिहीपर्यंत 87 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला पाहिले आहे. लोक ही व्हिडीओ क्लिप केवळ एकमेकांसोबत शेअर करत नाहीत तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देखील देत आहेत. हा मजेदार व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही तो खूप मजेदार वाटेल.