मुंबई : सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. जे खूपच मनोरंजक असतात. एवढंच काय तर एकदा का आपण येथे आलो की, आपला वेळ कसा निघून जातो, याचं आपल्याला भान देखील उरत नाही. येथे मनोरंजक, सायन्स, जेवण, ट्रॅव्हल सारखे आणखी बरेच व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो एका प्राण्याचा आहे. परंतु हा व्हिडीओ अंगावर काटा उभा करणारा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रेल्वे रुळावर असलेल्या कुत्र्याचे प्राण वाचवतो. परंतु हे संपूर्ण दृश्य धक्कादायक आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून लोक खूप भावूक झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओवर लोक जोरदार कमेंट देखील करत आहेत आणि त्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत.


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती रेल्वेच्या ट्रॅक वरुन पळत आहे. त्या ट्रॅकवर ट्रेन देखील येत आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे दिसेल की, एक कुत्रा देखील तेथे आहे आणि त्याला वाचवण्यासाठी हा व्यक्ती आपल्या जीवाची पर्वा न करता धावत आहे.



हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. HumanBeingBro नावाच्या युजर हँडलवरून ट्विटरवर हे शेअर करण्यात आले आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला आतापर्यंत 50 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट्सही आल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे हा खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे.