टीव्ही चालू करण्यासाठी व्यक्तीने वापरली ही पद्धत...व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाला, `हे कसं शक्य`
पूर्वीच्याकाळात टीव्ही खराब झाला की, लोक त्याला हाताने मारायचे आणि तो टीव्ही पुन्हा चालू व्हायचा. परंतु आजकालतच्या टीव्ही सोबत असे घडत नाही...
मुंबई : तुम्ही हे पाहिले ऐकले असेल की, पूर्वीच्याकाळात टीव्ही खराब झाला की, लोक त्याला हाताने मारायचे आणि तो टीव्ही पुन्हा चालू व्हायचा. परंतु आजकालतच्या टीव्ही सोबत असे घडत नाही, ते खराब झाले तरी त्यांना दुरुस्त करण्यासाठीच द्यावे लागतात किंवा मग लोक त्याला दुरुस्त करण्याच्या भांगडीत पडत नाही. सगळ दुसरा टीव्ही घरी घेऊन येतात. त्यामुळे आजकालच्या मुलांसाठी टीव्ही मारुन देखील चालू केला जाऊ शकतो हे पाहणे म्हणजे एखादी जादू झाल्यासारखे आहे.
काही लोकांसाठी त्यांच्याजवळील काही वस्तू प्राणपेक्षा प्रिय असतात, त्यामुळे ते त्यांना टाकून देत नाहीत. तर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात.
सध्या यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती टीव्हीला काठीने मारत आहे जेणेकरून ते पुन्हा चालू होईल. पण त्याला पाहून तुम्हाला काय वाटतो? तो टीव्ही पुन्हा सुरू होईल? तसे पाहाता तो टीव्ही फारच जुणा दिसत आहे, त्यामुळे तो सुरू होण्याचे काही लक्षणे दिसत नाही. परंतु तरीदेखील तो व्यक्ती त्या टीव्हीला मारतो आणि काय आश्चर्य तो टीव्ही चालू होतो.
सध्या इंटरनेटच्या दुनियेत या जुण्यापद्धतीचा टीव्ही सुरु होण्याचा हा व्हिडीओ खूप धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की, तीन -चार वेळा मारल्यानंतर हा टीव्ही लगेच चालू होतो.
हा व्हिडीओ ट्विटर युजर EYE CATCHING PLUS ने त्याच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, Done. म्हणजेच काम झालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोकांना त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एका यूझरने लिहिले की, मी सुद्धा हीच पद्धत अनेक वेळा वापरुन पाहिली पण याचा काहीच फायदा झाला नाही.
तर काही यूझर्सने आश्चर्य व्यक्तं केला आहे. त्याचे असे म्हणणे आहे की, 'ज्यापद्धतीने तो व्यक्ती त्या टीव्हीला मारत आहे ते पाहाता तो टीव्ही चालू नाही तर तो फूटण्याची शक्यता होती. परंतु हा चालू झाला ही आश्चर्याची गोष्ट आहे'
ही बातमी लिहिण्यापर्यंत या व्हिडीओला 1 हजाराहून अधिक व्ह्यूज आणि 50 हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. यासह, लोक ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर देखील याला शेअर केले आहे.