Physics Wallah Teacher Beaten Video : एक काळ असा होता, जेव्हा शिक्षकांना (Teacher) आदर असायचा. गावातून जाताना शिक्षक समोरून गेले तरी विद्यार्थ्यांची मान वर होत नसायची. मात्र, आता काळानुरूप परिस्थिती बदलली आहे. आता शिक्षकांना शिवागाळ करणं अन् मारहाण करण्याच्या घटना सर्रास पहायला मिळतात. अशातच आता सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ (Teacher Beaten) समोर आला आहे. यामध्ये एक विद्यार्थी शिक्षकांना चक्क चप्पलेनं मारहाण देताना दिसतोय. एका प्रसिद्ध प्लॅटफॉर्मवरील (Physics Wallah) शिक्षकाला मारहाण झाल्याने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडाल्याचं दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या व्हायरल झालेला हा व्हिडिओ (Viral Video) प्रसिद्ध कोचिंग सेंटरचा आहे, असं सांगितलं जातंय, जो स्पर्धा परीक्षांची तयारी करतो. या माध्यमातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये कोचिंग सेंटरच्या ड्रेस कोडमधील एक विद्यार्थी शिक्षकाला (Teacher Gets Beaten Up By Student) चप्पलने मारहाण करताना दिसत आहे. या विचित्र व्हिडीओमध्ये शिक्षकासोबत होत असलेले गैरवर्तन पाहून लोक सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय.


व्हिडीओ व्हिडीओमध्ये दिसतंय की, भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्सचा क्लास सुरू आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना संकल्पना शिकवत असतात. तेवढ्यात एक विद्यार्थी शिक्षकांच्या स्टेजवर येतो अन् चप्पलेनं मारहाण करतो. हे दृष्य पाहून विद्यार्थी अन् शिक्षक देखील चकित झाले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असून अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केलीये.


पाहा Video



दरम्यान,  सोशल मीडियावर 9 सेकंदाची क्लिप व्हायरल होत आहे. प्रकरण नेमकं काय आहे? विद्यार्थी अन् शिक्षक यांच्यात नेमकं कोणत्या कारणावरून बाचाबाची झाली? याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र, विचारिक लढाईमध्ये संयमाची व्याख्या शिक्षक शिकवायचे विसरले,  हे मात्र नक्की...