अपघातानंतर पोलिसांनी चालकाला त्याच ठिकाणी नेलं आणि धु-धू धुतलं; VIDEO व्हायरल
Viral Video: गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथे एका कारचालकाला अपघात करणं चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी अपघात झालेल्या ठिकाणी चालकाला नेलं आणि चांगलीच धुलाई केली. याचं कारण कारचालक मद्यपान करुन कार चाललत होता.
Viral Video: गुजरातच्या (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथे एका कारचालकाला अपघात करणं चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या कारचालकाला घटनास्थळी नेऊन चांगलीच धुलाई केली. मणीनगर परिसरात सोमवारी एका कारलाचकाने अपघात केला होता. यावेळी त्याने मद्यपान केलेलं होतं. दरम्यान, अपघात झाला तेव्हा फूटपाथवर काही लोक होते. मात्र सुदैवाने त्यांच्यातील कोणीही जखमी झालेलं नाही.
पोलिसांनी मंगळवारी कारवाई करत आरोपी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं. यानंतर ते चालकाला अपघात झाला होता त्या घटनास्थळी घेऊन गेले. यावेळी पोलिसांनी लोकांसमोर चालकाला धडा शिकवला. पोलिसांनी लाठीने चालकाला बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर त्यांना मारहाण करताना कॅमेऱ्यात व्हिडीओही रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओत पोलीस अधिकारी वर्दळीच्या ठिकाणी आरोपी चालकाला रस्त्यावर उभं करुन लाठीने फटके लगावताना दिसत आहे. यावेळी एक पोलीस कर्मचारी आरोपी चालकाला पकडून उभा आहे. यानंतर आणखी एकाला फटके लगावण्यात आले. यावेळी तो अधिकाऱ्याकडे वारंवार माफी मागत असतो. पण अधिकारी लाठ्यांचा प्रसाद देणं थांबवत नाही.
या व्हिडीओनंतर नेटकरी पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करत आहेत. तर काहींनी विरोध केला आहे.
याआधी अहमदाबादमध्ये 19 जुलैच्या रात्री मोठा अपघात झाला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात लोकांना चिरडण्यात आलं होतं. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला होता. तर 10 लोक जखमी झाले होते. या अपघातानंतर जमावाने 20 वर्षाच्या कार चालकाला बेदम मारहाण केली होती. या हल्ल्यात तो जखमी झाला होता. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.