बॉलिवूड हे चित्रपटांसह आपल्या संगीतासाठीही जगभरात प्रसिद्ध आहे. याचं कारण बॉलिवूडमध्ये प्रत्येक भावनेसाठी गाणं आहे. मग तो सण असो किंवा आनंद, दुखाचा कोणताही क्षण असो, बॉलिवूड म्हणजे गाण्यांचा खजिनाच आहे. त्यातील काही गाणी आपल्यासह आयुष्यभर राहतात. ती गाणी कितीही जुनी झाली तरी ती मनात कायमचं घऱ करुन राहतात. गाण्यांची ही आवड प्राण्यांनाही असते असं म्हटलं जातं. काही प्राणी संगीत ऐकल्यावर तशाप्रकारे प्रतिक्रियाही देतात. दरम्यान असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये श्वान अरिजित सिंगचं गाणं ऐकताच त्यावर व्यक्त होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माणसांप्रमाणे श्वानांचीही आवडती गाणी असावीत का? याचं उत्तर माहित नाही, पण एका व्हिडीओमुळे हे खरं असावं असंच दिसत आहे. याचं कारण अरिजित सिंगचं गाणं लागताच श्वान जोरजोरात भुंकू लागतो. इंस्टाग्रामला शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 


व्हिडीओत नेमकं काय?


व्हिडीओच्या सुरुवातील श्वान सोफ्यावर झोपलेला दिसत आहे. त्यावेळी टीव्हीवर गाणी लागलेली असतात. पण श्वानाचं या गाण्याकंडे लक्ष नसतं. पण नंतर जेव्हा अरिजित सिंगचं 'तुझे कितना चाहने लगे' गाण लागतं तेव्हा लगेच श्वान उठतो आणि त्यावर व्यक्त होतो. 


एका इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 'आपलं आवडतं गाणं ऐकल्यानंतर श्वानाची प्रतिक्रिया. दील का दरिया'



हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याला 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, 'त्याचा मालक हे गाणं ऐकल्यावर कदाचित फार रडत असेल. त्यामुळे आपला मालक पुन्हा एकदा रडणार असल्याची जाणीव त्याला झाली असेल'. तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, त्याचे एक्स्प्रेशन पाहता कदाचित तो गाणं बदलण्याची मागणी करत आहे.