मुंबई : सध्या चालू असलेल्या टोकियो ऑलिम्पिक 2021 च्या दरम्यान, खेळातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खेळांचे तसे अनेक प्रकार आहेत. खेळ म्हटलं ही हरणे जिंकणे हे सगळं येतातचं. काही खेळाडूंना त्यांच्या नशीबाची चांगली साथ मिळते, तर काही खेळाडूंचे नशीब इतके वाईट असते की, त्यांची चूकी नसताना देखील त्यांना हार पत्कारावी लागते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेळ किंवा स्पर्धेच्या मध्यभागी खेळाडूंसोबत अनेक वेळा अपघात घडतात, ज्यात ते गंभीर जखमी होतात. अलीकडेच सोशल मीडियावर एका स्पर्धेचा वेदनादायक आणि धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


यात एक व्यक्ती दोरीच्या मदतीने उंचीवर चढत असतो. ही उंची फार मोठी आहे, त्या माणसाला दोरीच्या सहाय्याने फार उंचावर चढून त्यांचे लक्ष गाठायचा होते. परंतु हा व्यक्ती त्याच्या लक्षापासून काही क्षण दूर असताना त्याच्या सोबत असे काही घडते की, ज्याला पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल.


कारण त्याच्या सोबत अशीच धक्कादायक घटना घडली आहे. हा व्यक्ती त्याच्या लक्षापासून काही क्षणच दूर असताना त्याची दोरी तुटते आणि तो खूप उंचावरुन खाली पडतो. तो व्यक्ती ज्या वेगाने खाली पडतो, तो वेग पाहून तुम्ही काही काळासाठी थक्कं व्हाल.


हा व्यक्तीला जेव्हा खाली पडतो तेव्हा त्याला प्रचंड वेदना होत आहेत आणि तो मोठ्या आवाजात किंचाळू आणि ओरडू लागतो. त्याच्या ओरडण्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, या व्यक्तीला किती दुखापत झाली असावी. त्याच्या जवळ उभी असलेली व्यक्ती त्याला कुठे लागलं आणि नक्की त्याला काय होतोय हे विचारतो, तेव्हा या व्यक्तीला त्याला उत्तर देखील देता येत नाही. कारण त्याला इतक्या वेदना होत असताता की, तो काही बोलण्याचा परिस्थितीत नसतो.



हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी सोशल मीडिया साइट ट्विटरवर शेअर केला आहे. या 30 सेकंदाच्या व्हिडीओवर लोकांनी या व्यक्तीसाठी सहानुभूती व्यक्तं केली आहे. सोशल मीडियावर यूझरने असे देखील कमेंट केलं आहे की, या व्यक्तीला काही गंभीर दुखापत होता कामा नये, नाहीतर त्याला आयुष्यभरासाठी हे महागात पडू शकते.