मुंबई : सोशल मीडियावर आपल्या समोर वेगवेगळे व्हिडीओ येत असतात, जे आपलं मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. आपल्याल तर हे माहित आहे की, पावसाळ्यात नाल्यांची साफसफाई न केल्यामुळे ते तुंबतात आणि रस्ते जलमय होतात हे तुमच्या नेहमी लक्षात आले असेल. ज्यामुळे नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्त्यावर चालताना एका व्यक्तीसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. जे पाहून तुम्हाला हसू तर येईल, परंतु हा प्रकार किती भयंकर आहे, हे तर तुम्हाला हा व्हिडीओ पाहून कळेलच.


व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्कूटीस्वार एका वृद्ध व्यक्तीला रस्त्यावर सोडून पुढे जात आहे. त्यात पावसाळामुळे रस्त्याच्या कडेला पाणी तुंबलं आहे, ज्यामुळे गटार उघडं ठेवण्यात आलं आहे. 


त्यावेळी या व्यक्तीसोबत एक अप्रिय घटना घडते. या वृद्धाला स्वत:ला सांभाळता येत नाही आणि तो थेट गटारात पडतो. व्हिडीओमध्ये पुढच्या क्षणात जे काही घडतं, ते पाहून तुम्हाला धक्का बसेल.


या वृद्धं व्यक्तीला गटारात पडताना पाहून शेजारी उभे असलेले लोक तातडीने मदतीसाठी धावले. मात्र गटारातील पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान होता की, तो व्यक्ती काही सेकंदातच तेथे दिसेनासा झाला.


सुदैवाने लोकांनी युक्तीचा वापर केला आणि गटाराचा प्रवाह जिथून जात होता, तेथे जाऊन उभे राहिले. तिथे अखेर तो वृद्ध व्यक्ती त्याच्या हाताला लागला आणि त्यांनी याला वर खेचले, ज्यामुळे या वृद्ध व्यक्तीचे प्राण वाचले आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर coach_manjunath_kickboxer नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.


ज्या लोकांनी वृद्धांना मृत्यूच्या तोंडातून बाहेर काढले, त्या लोकांचेही बहुतांश लोकांनी आभार मानले आहेत. नाल्यातून बाहेर काढल्यानंतर वृद्धाला बेशुद्धावस्थेत पडल्याचे व्हिडीओत दिसत आहे. लोकांनी त्याच्या पोटावर दाब देऊन पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच तो व्यक्ती शुद्धीवर आला.