मुंबई : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल्या शिवाय राहाणार नाही आणि तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. वास्तविक, हा व्हिडीओ एका प्राणीसंग्रहालयातील आहे. येथे एक व्यक्ती सिंहाच्या समोर उभा आहे. तो ही सिहाला न घाबरता. हा सगळा प्रकार पाहून जवळ उभ्या असेलेल्या लोकांनी त्याचा व्हिडीओ काढला. या व्यक्तीचे धाडस पाहून लोकांना भीती वाटू लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती प्राणीसंग्रालयात तलावात उभा आहे. तेव्हा तेथे तलावाच्या जवळ एक सिंहीण येते. परंतु तरीही सिंहिणीला न घाबरता आणि परिणामांची पर्वा न करता व्यक्ती सिंहिणीसमोर उभा राहातो आणि काही ना काही बोलत असतो.


जेव्हा सिंहीण त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे सरकते तेव्हा तो सिंहिणीकडे बोट दाखवतो, त्याचे धैर्य पाहून सिंहीणही मागे हटते. हे दृश्य पाहून बाहेर उभे असलेले लोक जोरजोरात ओरडू लागताता.


हा प्रकार एवढ्यावरच थांबत नाही, तर तेथे दुसरी एक सिंहिण येते, ज्यामुळे ही घटना आणखी गंभीर होते.


आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा हाताने इशारा करुन ही व्यक्ती सिंहाला मागे जायला सांगिते. सिंहाचं वागणं आणि या व्यक्तीला पाहून लोकं येथे श्वास रोखून बसलेले आहेत  आणि या व्यक्तीला बाहेर बोलावण्याचा प्रयत्न करत आहेत, पण या व्यक्तीला काहीही फरक पडत नाही आणि तो त्यांच्यासमोर न घाबरता उभाच राहातो.


अखेर सिंहांच्या समोरून व्यक्ती का पळाली नाही, त्याचे कारण काय?


दोन सिंहांना घाबरवणारे या व्यक्तीच्या हातात काही हत्यार होते का, असा प्रश्न व्हिडीओ पाहणाऱ्या लोकांना पडला आहे, परंतु असे नाही. जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


वास्तविक त्या व्यक्तीने सिंहांना घाबरवण्याची किंवा थांबवण्याची तीच पद्धत अवलंबली जी तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे सिद्ध झाले. खरं तर सिंह नेहमी मानेवर हल्ला करतो आणि बहुतेक वेळा तो मागून हल्ला करतो, पण जर तुम्ही सिंहाशी लढत राहिलात त्याच्या नजरेला नजर देत राहिलात, तर कदाचित तुम्हाला घाबरु शकतो, परंतु अशा स्थितीत जर तुम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केलात तर लक्षात घ्या की, तुमची शिकार झालीच म्हणून समजा, कारण तुम्ही त्याच्यापेक्षा जोरात धावू शकणार नाही, ज्यामुळे तो मागून तुमची शिकार करु शकतो.