Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) आपला व्हिडीओ व्हायरल (Viral Video) व्हावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मग यासाठी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात अनेकदा फजिती होते. विशेष म्हणजे त्या व्हिडीओ हे फजिती झालेले व्हिडीओ जास्त व्हायरल होतात. असाच एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुणी जंगलात नदीच्या वरती ठेवण्यात आलेल्या लाकडावर योगा पोझ (Yoga Pose) देत असतानाच खाली कोसळत असल्याचं दिसत आहे. Chisa Mariee यांच्या अकाऊंटवरुन 2017 मध्ये हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. पण हा व्हिडीओ अजूनही काही ना काही कारणाने सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. 


व्हिडीओत नेमकं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओत एक महिला योगा पोझ देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण हा योगा कुठे जमिनीवर नाही तर थेट लाकडावर करण्याचा तिचा प्रयत्न असतो. त्यातही हे लाकून जंगलात एका नदीवर ठेवण्यात आलं होतं. व्हिडीओत महिला योगा पोझ देत असतानाच तोल जातो आणि पाण्यात जाऊन कोसळत असल्याचं दिसत आहे. 



ही महिला नंतर सुखरुप बाहेर आली होती. Meriee असं या महिलेचं नाव असल्याची माहिती आहे. आपल्या या व्हिडीओची तिनेही खिल्ली उडवली होती. ट्वीट करत तिने आपण चार ते पाच फूट खाली पडल्याचं सांगितलं होतं. पण पाण्याचा वेग प्रचंड असल्याने आपण 30 फूट मागे ढकलले गेलो होतो असंही तिने सांगितलं होतं.


हा व्हिडीओ ट्विटरवर फार व्हायरल झाला होता. एका युजरने याला म्हणतात प्रवाहासोबत जाणं अशी उपहासात्मक कमेंट केली आहे. तर काहींनी जर ती डोक्यावर आपटली असती तर जीव गमावला असता असं सांगत अशी गोष्टी करताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.