स्टंट करण्याच्या नादात महिलेनं हवेत उडी तर घेतली, पण चुकीची... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावरती लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय वाटेल ते करण्याचा प्रयत्न करतात.
मुंबई : सध्या आपल्यापैकी जवळ -जवळ प्रत्यक जण सोशल मीडियावर सक्रिय आहे. आपण सोशल मीडियाचा वापर मित्रांशी गप्पा मारणे, व्हिडीओ किंवा फोटो पाहाणे, माहिती मिळवणे यासाठी करतो. सोशल मीडियामुळे आपले मनोरंजन होते. सोशल मीडियावर आपल्या असे काही व्हिडीओ किंवा फोटो पाहायला मिळतात ज्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटते, आणि आपण असे व्हिडीओ आपल्या मित्राला देखील शेअर करतो.
सोशल मीडियावरती लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय वाटेल ते करण्याचा प्रयत्न करतात. कारण जितके लाईक्स आणि व्हिव्हस त्यांच्या पोस्टवरती त्यांना मिळतील तेवढे ते व्हायरल होतात, म्हणून मग काही अती हौशी लोकं वाटेल ते करण्याची तयारी दाखवतात.
परंतु फक्त लाईक्ससाठी आपलं आयुष्य पणाला लावणं कितपत योग्य आहे? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिलेला आणि पुरूष स्विमिंग पूलमध्ये स्टंट करताना दिसत आहे. परंतु तो स्टंट त्या महिलेला भलताच भारी पडतो.
व्हिडीओमध्ये, एक महिला टेरेसवरून आणि पुरूष स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना दिसत आहे, यामध्ये पुरूष तर ठरवल्या प्रमाणे पाण्यात सेफ उडी मारतो, परंतु या महिलेने कल्पना केल्याप्रमाणे काही घडत नाही. ती थेट तलावात पडण्याऐवजी त्या टेरेसच्या मध्यभागी असलेल्या कौलावर किंवा रुफवरती वाईट रीतीने आपटते आणि नंतर पाण्यात पडते. ज्यामुळे तिची सेफ लॅन्डिंग तर होतच नाही, परंतु आपटल्यामुळे तिला दुखापत झाली असावी एवढं मात्र नक्की.
हा भितीदायक व्हिडीओ ट्विटरवर द डार्विन अवॉर्ड्स नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत त्याने एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. बातमी लिहीपर्यंत या धक्कादायक व्हिडीओला 50 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
या व्हिडीओवर बऱ्याच लोकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, एका वापरकर्त्याने कमेंट केली, मी दाव्यासह सांगू शकतो की, तिची मान मोडली असावी. त्याच वेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले , मला हा मजेदार व्हिडीओ वाटत नाही त्या महिलेला खूप लागले असावे. या व्यतिरिक्त, इतर अनेक वापरकर्त्यांनी या व्हिडीओवर मजेदार कमेंट देखील केले आहेत.
हे असे व्हिडीओ पाहून आणि लोकांचा मूर्खपणा पाहून आपल्याला आपले हसू आवरत नाही. परंतु त्या व्यक्तीवर यामुळे काय गंभीर परिस्थिती आली असेल हे आपल्याला सांगणे कठीण आहे. परंतु आपण या व्हिडीओंना एक उदाहरण म्हणून पाहावं आणि स्वत: असा मुर्खपणा करु नये.