मुंबई : सोशल मीडियाचे जग लाखो व्हिडिओंनी भरलेले आहे. जिथे रोज काहीतरी व्हायरल होत असते. सध्या सोशल मीडियावर लष्करातील जवान आणि दुचाकीस्वार यांच्याशी संबंधित एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये बाईक चालवणाऱ्या व्यक्तीने असे घाणेरडे कृत्य केले ज्यामुळे जवान चांगलाच संतापला आणि लगेचच त्याला धडा शिकवला. काही वेळातच हा व्हिडिओ शेकडो जणांनी शेअर केला. नेटिझन्सही त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.


रस्त्यावर लाल सिग्नल असून सर्व वाहने हिरवा दिवा लागण्याची वाट पाहत असल्याचे दिसून येते. तेव्हाच एक व्यक्ती लाल दिव्याच्या मधोमध स्पोर्ट बाईक सुरू करते आणि जोरात रेसिंग सुरू करते. पाठीमागे दुसऱ्या वाहनावर असलेल्या लष्करातील जवानाने त्या व्यक्तीची कृती हेरली. स्पोर्ट बाईकवाल्या त्या राईडरला जवानाने सनसनीत चपराक मारली.


त्यावर तो व्यक्ती रागाने मारणाऱ्या व्यक्तीकडे पाहतो, मात्र लष्करी जवानाला पाहताच तो घाबरतो आणि सिग्नल हिरवा होताच तो गोळीच्या वेगाने तेथून निसटतो झाला.


 


इन्स्टाग्रामवर videolucu.funny नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.