Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्ध होण्यासाठी अनेक तरुण-तरुणी धडपड करत असतात. याचसाठी अनेकदा जीवघेणे स्टंटही केले जातात. पण अनेकदा असे प्रकार अंगाशी येतात आणि थेट पोलिसांपर्यंत पोहोचतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत दोन तरुण धावत्या कारमधून नोटा फेकत आहेत. पोलिसांनी या घटनेची दखल घेत तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. 


व्हिडीओत नेमकं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुग्राम येथील ही घटना आहे. व्हिडीओत तरुणांनी एक रील तयार केल्याचं दिसत आहे. यामध्ये आपल्यामागे पोलीस लागले आहेत असं दर्शवत तरुण धावत्या कारमधून नोटा फेकत आहेत. एक तरुण गाडी चालवत असताना दुसरा तरुण डिक्कीत बसून पैसे फेकताना व्हिडीओत दिसत आहे. गल्फ कोर्स रोडवर हा सगळा प्रकार घडला आहे. 



रीलमधील आवाज ऐकल्यानंतर हा ऑडिओ शाहिद कपूरच्या 'फर्जी' वेब सीरिजमधील सीन कॉपी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, व्हिडीओत तरुणांच्या गाडीचा क्रमांक स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ट्वीट करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. पोलिसांनी याची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. 



"सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला या व्हिडीओती माहिती मिळाली होती. व्हिडीओत दोन तरुण चित्रपटातील सीन कॉपी करण्यासाठी धावत्या कारमधून पैसे फेकत असल्याचं आम्हाला कळालं होतं. आम्ही वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपीची ओळख पटली आहे," अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विकास कौशिक यांनी दिली आहे.