Unique Wedding Video : युट्यूबर अमरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नींच्या बातम्या आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगल्याच चर्चेत असतात. अरमान मलिकच्या (Arman Malik) दोनही पत्नी गरोदर (Pregnent) आहेत आणि याचे फोटो तो शेअर करत असतो. आता असाच एक त्रिकोणी प्रेमप्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत (Viral Video) दोन मुलं एका मुलीबरोबर लग्न करताना दिसत आहेत. मुलगी बसली असून दोनही मुलं तिच्या आजूबाजूला उभी आहेत. दोघांनीही तिच्या भांगेत सिंदुर भरला आणि त्यानंतर दोघांनी मिळून मंगळसूत्रही तिच्या गळ्यात घातलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओ होतोय व्हायरल
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत ती दोन मुलं त्या मुलीशी लग्न करताना दिसत आहेत आणि त्या तिघांव्यतिरिक्त व्हिडिओत इतर कोणीही दिसत नाहीए. मुलगी खाली बसली आहे, तिच्या आजूबाजूला दोन मुलं उभी आहेत. आधी एका मुलाने तिच्या भांगेत सिंदुर भरला, त्यानंतर दुसऱ्या मुलाने कुंकवाची डबी घेत पुन्हा तिच्या भांगेत सिंदुर भरला. त्यानंतर दोघांनी मिळून त्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. दोनही मुलं शाळेपासून आपले प्रियकर असल्याचं त्या मुलीचं म्हणणं आहे.  या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


व्हिडिओ खरा की खोटा?
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्याची सत्यत्या अजून समोर आलेली नाही. कदाचित हा व्हिडिओ प्रँकही असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी मजेशीर तर काही लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं ही मुलगी भाग्यवान आहे. तर दुसऱ्या एका युजरने लग्न म्हणजे बाहुली-बाहुल्याचा खेळ बनवून ठेवल्याचं म्हटलंय. 


मध्यप्रदेशातही अशीच घटना?
काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातही  (Madhya Pradesh) अशीच एक घटना समोर आली होती. एका व्यक्तीने दोन लग्न केली आणि हे प्रकरण थेट कोर्टापर्यंत गेलं. या प्रकरणात ग्वाल्हेर फॅमिली कोर्टाने (Family Court of Gwalior) दिलेला निर्णय चर्चेचा विषय बनला आहे.  ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचं 2018 साली लग्न झालं. त्यांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नानंतर दोनच वर्षात तो नोकरी करत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याबरोबर त्याचे प्रेम संबंध जुळले. काही महिने तिच्याबरोबर लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्याने तिच्याशी लग्न केलं. 


प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं
दरम्यान पहिल्या पत्नीला आपल्या पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल समजलं. यावरुन पतीचं आणि पहिल्या पत्नीचं भांडण झालं आणि प्रकरण कोर्टापर्यंत गेलं. पहिल्या पत्नीला पतीला घटस्फोट द्यायचा नव्हता. तर, दुसरी पत्नीही पतीला सोडायला तयार नव्हती. शेवटी कोर्टाने मध्य मार्ग काढत त्या व्यक्तीला दोन्ही पत्नींसह राहण्याचा सल्ला दिला. आठवड्याचे पहिले तीन दिवस एका पत्नीसह तर पुढचे ती दिवस दुसऱ्या पत्नीसह राहण्याचा आदेश दिला. रविवारी इच्छेनुसार कोणत्याही पत्नीसह राहू शकतो असे आदेश कोर्टाने दिले.  कोर्टाने सुचवलेल्या या पर्यायावर तिघेजण तयार झाले.