Video : अरे देवा साप महिलेची चप्पलच घेऊन फरार...
Viral Video : तुम्ही कधी चप्पल चोर साप (Snake) पाहिला आहे का? सध्या चप्पल चोर सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहे.
Snake Viral Video : साप म्हटलं की आपल्याला घाम फुटतो. सोशल मीडियाच्या जगात आपण अनेक साप (Snake), किंग क्रोबा (King Croba), अजगराचे (python) व्हिडिओ पाहिले आहे. पण चप्पल चोर साप कधी पाहिला आहे का? हो चप्पल चोर साप (Slipper thief snake) बरोबर ऐकलं तुम्ही...पण हा व्हिडिओ पाहून तुम्ही कपाळाला हात मारुन घ्याल. सापाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Video viral on social media) होतो आहे.
सापाचा व्हिडिओ
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घराच्या पायऱ्यांवर साप चढण्याचा प्रयत्न करत आहे. तितक्यात घरातील एका महिलेचं लक्ष जातं. ती सापाला पळवून लावण्यासाठी चप्पल फेकून मारते.
चप्पल सापाला लागते त्यामुळे साप तिथून पळ काढतो पण हे काय तो साप चप्पल घेऊन तिथून सुसाट पळतो. या व्हिडिओमध्ये ती महिला माझी चप्पल करत ओरडत सुटते. (Viral Video Slipper thief snake funny video viral on Social media)
मजेदार व्हिडिओ
हा मजेदार व्हिडिओ आयएफएस अधिकारी परवीन कासवान (IFS officer Parveen Kaswan) यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''साप या चप्पलेचं नक्की काय करणार ? त्याला तर पायही नाही आहेत.'' हा मजेदार व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान पसंती मिळतं आहे. शिवाय या व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या कंमेट्स करत आहेत.