Trending Video : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ क्षणाक्षणाला व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ आपले लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ पाहून यूजर्सना आश्चर्यचा धक्का बसतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा एका वसतिगृहातील आहे. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आलेले विद्यार्थी इथे राहतात. स्पर्धा परीक्षा अवघड असून त्यासाठी विद्यार्थ्याना अहोरात्र मेहनत करावी लागते. या परीक्षेंमध्ये अनेकांना यश होतं तर काहींच्या हाती वारंवार निराशा येते. अशात हताश होऊन अनेक जण टोकाची भूमिका घेतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांबद्दल कायम पालकांना चिंता असते. (viral video student who gave the competitive exam did not open the door for 2 hours police opened the door than Trending now)


काय रे देवा..! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असाच एक विचित्र प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थी आपल्या आपल्या खोलीत अभ्यास करत असतात. अशा एका मुलाने आपल्या मित्राच्या खोलीचा दरवाजा ठोठवला. पण त्याने काही केल्या दरवाजा उघडला नाही. बराच वेळ उलटला अगदी दोन तास झाले मित्र दरवाजा उघड नाहीय. आता त्याने जीवाचं बरं वाईट केलं तर नाही अशी शंका त्या मित्राच्या मनात येऊ लागली. 
त्याने कसलाही विचार न करता थेट पोलिसांना फोन फिरवला आणि त्यांना वसतिगृहात बोलावून घेतलं. आता त्या मुलाच्या खोलीबाहेर सगळी मुलं आणि पोलीस जमा झाले होते. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद होत होती. पोलिसाच्या बऱ्याच प्रयत्नांनंतर खोलीचा दरवाजा उघडण्यात यश आलं. खोलीचा दरवाजा उघडताच जे पाहिलं ते पाहून आश्चर्य चकित करणारं होतं. 


खोदा पहाड़ निकली चुहिया!


हो, अगदी असंच झालं...खोलीचा दरवाजा उघडला तर हा महाशय मस्त गाढ झोपला होता. पोलीस काय त्याच्या मित्रांनी त्याला पाहून डोक्याला हात मारून घेतला. त्यानंतर प्रत्येक जण हसायला लागला. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच हसू आवरु शकणार नाही. असे किस्से वसतिगृहात असताना अनेकांसोबत कधी ना कधी झालेयत. 



हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @rose_k01 नावाच्या युजरने पोस्ट केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तर हा व्हिडीओ कोटामधील बॉईज हॉस्टेलचा असल्याच सांगण्यात येत आहे. या व्हिडीओवर यूजर्सची संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.