Viral Video : सध्या सोशल मीडियावर (Social Media) 'एका वाघाची शिकार, एका हरणीने केली', हेच गाणं सगळीकडे ऐकू येतय. जोडपी या गाण्यावर रील्स बनवती सुटली आहेत आणि ते पोस्ट करत आहेत. सारखं हेच गाणं ऐकून ऐकून लोकंही वैतागली आहेत. या गाण्यावरुन आता मीम्सनाही उत आला आहे. मात्र प्रत्यक्षात शिकारीसाठी आलेल्या वाघालाच (Bengal tiger) एका हरणानेच (deer) कात्रजचा घाट दाखवला आहे. याचा एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधील (West Bengal) सुंदरबनमधील (Sunderban) आहे. व्हिडीओमध्ये वाघाने हरणाची शिकार करण्याचा फसलेला प्रयत्न दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुंदरबनातील एका वनसहाय्यकाने मोबाईल कॅमेरात रॉयल बंगाल टायगरच्या हरिण शिकारीचा एका व्हिडिओ चित्रित केला आहे. व्हिडिओत बेसावध असणारी तीन हरणं आणि त्यांची शिकारीसाठी वाघचं दबा धरुन बसणं विशेष लक्ष वेधून घेतं. वाघानं शिकारीसाठी झेप घेतल्यावर हरिण स्वतःची सुटका कशी करुन घेते याचीही दृश्यं फार बोलकी आहेत. सुंदरबनातील एका वनसहाय्यकाने मोबाईल कॅमेरात रॉयल बंगाल टायगरच्या हरिण शिकारीचा एका व्हिडिओ चित्रित केला आहे.


काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?


या व्हायरल व्हिडीओमध्ये वाघ झुडपात घात घालून बसलेला दिसत आहे. वाघाच्या समोरच हरणांचा कळप आहे. वाघ झाडाझुडपात असा लपून बसला आहे की हरणांना तो दिसला नाही. यानंतर  वाघ हळू हळू त्यांच्याकडे सरकतो. पण एका हरणाची नजर त्यावर पडते आणि सगळे धूम ठोकतात. वाघापासून वाचण्यासाठी सगळे इकडे तिकडे पळू लागतात. त्यात वाघ एका हरणाला हेरतो आणि त्याचा पाठलाग करतो. धावता धावता हरीण तळ्यात शिरते. वाघानेही पराभव मान्य केला नाही आणि त्यानेही पाण्यात उडी घेतली. पाण्यात गेल्यावरही वाघाने हरणावर झेप घेतली. मात्र हरीण हुशारीने पाण्याखाली गेलं आणि दुसऱ्याच बाजूला निघालं. वाघ त्याचा दुसरीकडे शोध घेताना दिसत आहे. वाघाला चकवून हरीण पाण्याबाहेर येते आणि पळत सुटते. वाघसुद्धा किनाऱ्यावर येते मात्र हरीण पळून गेल्याचे पाहून तो तिथेच थांबतो. व्हिडीओमध्ये शेवटी वाघाच्या चेहर्‍यावरून तो निराश झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.



कोणत्या चित्रपटातील आहे हे ट्रेडिंग गाणे?


दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली, एका वाघाची शिकार, एका हरिणीने केली.... हे गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. बरीच मंडळी आपल्या पत्नी आणि गर्लफ्रेन्डसोबत यावर रील्स तयार करत आहेत. हे गाणे गेल्या वर्षी आलेल्या फतवा या चित्रपटातील आहे. ब्ल्यु लाईन फिल्मस् प्रस्तुत आणि प्रतिक गौतम दिग्दर्शित ‘फतवा’ हा चित्रपट गेल्या वर्षी 9 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत या कलाकारांची चित्रपटात मुख्य भूमिका होती.