Traffic Cop Saves Man : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral)होत असतात. काही व्हिडिओ खुप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एका वाहतूक पोलिसाने हार्ट अटॅक आलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचवले आहे. या वाहतूक पोलिसाचे (Traffic Police) आता सर्वत्र कौतूक होत आहे.


व्हिडिओत काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक व्यक्ती चालता चालता अचानक रस्त्यावर कोसळली होती. या व्यक्तीला हार्ट अटॅक (Heart Attack) आला होता. या व्यक्तीची अवस्था पाहून रस्त्यावर कर्तव्य बजावत असणाऱ्या वाहतूक पोलिसाने (Traffic Police)त्याच्या दिशेने धाव घेतली होती. तसेच व्यक्तीला हार्ट अटॅक आल्याचे कळताच वाहतूक पोलिसाने त्याला (CPR) म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन देण्यास सुरुवात केली होती. व्यक्तीला जाग येईपर्यंत हा पोलीस त्याची छाती दाबत असतो. काही मिनिटे सलग छातीवर दाब दिल्यानंतर तरूण जागा होतो आणि श्वास घेऊ लागतो.  वाहतूक पोलिसाने दाखवलेल्या या प्रसंगावधाने व्यक्तीचा जीव वाचला आहे. तसेच पोलिसाने दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतूक होत आहे. 


तेलंगणाचे आरोग्य मंत्री हरीश राव थनेरू (Harish Rao Thanneeru) यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला ते म्हणतात की, "राजेंद्रनगर पोलिस स्टेशनचे वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल (Traffic Police)राजशेखर यांनी त्वरित CPR देऊन जीव वाचवला. त्यांनी हे कौतुकास्पद काम केले आहे. अशा वाढत्या घटना पाहता तेलंगणा सरकार पुढील आठवड्यात सर्व फ्रंटलाइन कर्मचारी आणि कामगारांना CPRचे प्रशिक्षक देणार आहे, असे ते म्हणाले आहेत. 



दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडवत आहे. हा व्हिडिओ पाहून पोलिसांच्या कार्याचे कौतूक होत आहे.  सायबराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले आहे, त्याच्यावर उपचार सूरू आहेत. 


ही घटना हैदराबादच्या तेलंगाणाध्ये घडली आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.