लेडी बाहुबली! जिममध्ये महिलेचा साडीत जबरदस्त वर्कआऊट, Video व्हायरल
नव्या वर्षात व्यायाम करण्याचा केवळ संकल्प करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ ठरतोय प्रेरणादायी, साडित महिलेने केल्या वर्कआऊटच होतंय कौतुक
Viral Video : नव्या वर्षात आपण अनेक संकल्प करतो. यातला सर्वांचा आवडीचा संकल्प म्हणजे नव्या वर्षात व्यायाम करण्याचा. वर्षाच्या पहिल्या दिवसापासून अनेक जण जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. पण कालांतराने जिमला जाणं हळूहळू बंद होतं. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्यायाम करण्याचा संकल्प करुन मोडणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणा देणारा ठरतोय. जिममध्ये साडीत एका महिलेने वर्कआऊट करतानाचा हा व्हिडिओ असून सोशल मीडियावर या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळतायत.
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून विस्मृतीत जातात. तर काही व्हिडिओ कायमचे लक्षात राहतात. काही व्हिडिओ असेही असतात, ज्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतील महिलेचं सर्वत्र कौतुक होत आहे. अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडिओ रीना सिंह नावाच्या एका फिटनेस फ्रीक यूजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
गुलाबी रंगाची साडी नेसलेली एक महिला जिममध्ये वर्कआऊट करताना या व्हिडिओत दिसत आहे. फक्त कार्डियोच नाही तर ही महिला साडी नेसूनच वेट लिफ्टस, पुश अप्स करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर एका मोठा टायर उचलून ती क्रन्चेस मारताना दिसत आहे. महिलेने या व्हिडिओ सोबत लिहिलंय, ही तर फक्त सुरुवात आहे. या व्हिडिओला 935,000 हून अधिका लाइक्स आणि 33 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
या व्हिडिओवर अनेक युजर्सने प्रतिक्रियाही दिल्या आहेत. साडीत वर्कआऊट करणाऱ्या या महिलेचं युजर्सने कौतुक केलं आहे. एका युजर्सने म्हटलंय, ही कमाल आहे, तर काही युजर्सने याचा विरोधही केला आहे. अशा प्रकारचे आऊटफिट परिधान करुन व्यायाम करणं चुकीचं असल्याचं काही जणांनी म्हटलं आहे.