स्वत:च्या लग्नात डान्स करणं वधू-वराला पडलं महागात, त्यांच्यासोबत पुढे काय घडलं; पाहा मजेदार व्हिडीओ

तुम्ही सोशल मीडिया उघडलात की, तुम्हाला एक तरी लग्नाशीसंबंधीत व्हिडीओ पाहायला मिळतो.
मुंबई : सध्या सर्वत्र लग्नाचा सीजन सुरू आहे. ज्यामुळे तुम्ही सोशल मीडिया उघडलात की, तुम्हाला एक तरी लग्नाशीसंबंधीत व्हिडीओ पाहायला मिळतो. हा व्हिडीओ काही विधीदरम्यानचा असतो. तर कधी लग्नातील डान्सचा, तर कधी लग्नातील एखाद्या क्षणाचा. लोकं आपल्या लग्नाचा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी वेगळे करण्याचा विचार करतात. पण कधी कधी अशा प्रसंगी अशा मजेदार घटना घडतात, ज्यामुळे लोकांना खूप हसू येते.असाच एक व्हिडीओ आजकाल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बऱ्याचदा लग्नात नववधू आणि नवरदेव डान्स करतात आणि एन्ट्री घेतात. त्याच पद्दतीने या जोडप्यानं देखील एन्ट्री केली. परंतु त्यांनी कधी असा विचार देखील केला नसावा की असं काही तरी त्यांच्यासोबत घडलं.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, हे जोडपे आपल्या लग्नासाठी किती उत्सुक आहेत. ते त्यांच्या लग्नात डान्स करताना इतके उत्साही झाले की, त्यांना नाचताना त्यांचा तोल सांभाळता आला नाही आणि ते दोघेही खाली पडले. ज्यामुळे उपस्थित सगळे पाहूणे त्यांच्यावरती हसू लागले.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ पाहणाऱ्या एका वापरकर्त्याने सांगितले की, याला प्रेमात पडणे म्हणतात. त्याच वेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने सांगितले की, या वधूचा आनंद खरोखर पाहण्यासारखा आहे.
तर दुसऱ्या वापरकर्त्याने सांगितले की कधीकधी अशा घटना घाईने होतात. त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. या व्यतिरिक्त, काही लोकांनी सांगितले की, मी प्रार्थना करतो की, या काळात त्यांना जास्त दुखापत होऊ नये.
हा व्हिडिओ haitianbeauty25 नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. पण आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोक जोरदार हसत आहेत. यासह, काही लोकांनी त्यांच्या संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की यापूर्वीही अशाच काही व्हिडिओंनी इंटरनेटच्या जगात खूप मथळे बनवले आहेत.