आज 26 एप्रिल, सगळ्यांनाच आतुरता विशाल आणि कुसुमच्या भेटीची...
कुसुमने नोटवर लिहिलेल्या मेसेजनुसार 26 एप्रिल म्हणजे आज तिचं लग्न होणार आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 10 रुपयांची नोट भलतीच व्हायरल झाली होती. ज्यावर कुसुम नावाच्या मुलीने तिचा प्रियकर विशाल याला एक मेसेज लिहिला होता. ज्यानंतर सर्व लोक या नोटचा फोटो आपल्या ओळखीच्या सर्वच विशाल पर्यंत पोहोचवू लागले होते. ज्यामुळे हा फोटो ट्रेंड होऊ लागला होता. खरं तर या नोटवर कुसुम नावाच्या मुलीने लिहिले होते की, 'विशाल, माझे लग्न २६ एप्रिलला आहे. मला इथून घेऊन जा. मी तुझ्यावर प्रेम करते. तुझे कुसुम.'
या नोटवरील मेसेजवर 25 एप्रिल रोजी एका विशालने रिप्लाय दिला होता आणि तो कुसुमला भेटायला येईल असे त्याने लिहिले होते. आता हे जे काही घडलं, ते बनावट किंवा ठरवून केलेलं आहे की, नाही याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु आज 26 एप्रिल असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष विशाल आणि कुसुमच्या प्रेम कहाणीवर आहे.
कुसुमने नोटवर लिहिलेल्या मेसेजनुसार 26 एप्रिल म्हणजे आज तिचं लग्न होणार आहे. ज्यामुळे आज कुसुम आणि विशाल एकमेकांना भेटू शकतील का? त्यांची प्रेम कहाणी आज पूर्ण होईल का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. ज्यामुळे सगळ्या नेटकऱ्यांचं लक्ष सोशल मीडियावर लागलंय की, येथे त्यांना या दोघांच्या लग्नाची बातमी मिळतेय का?
असा संदेश विशालने कुसुमसाठी लिहिला
'कुसुम, मला तुझा संदेश मिळाला आहे. मी तुला घ्यायला येईन. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझा विशाल.' त्यांचं हे प्रेम पाहून अनेकांना आश्चर्यवाटत आहे.
एकदिवस कुसुमचा मेसेज काय येतो आणि काही दिवसात विशाल तिला रिप्लाय काय देतो. ज्यामुळे लोकांमध्ये आता या दोघांच प्रेम कुठपर्यंत पोहोचतं, आणि हे दोन प्रेमी एकमेंकांना भेटू शकतील का, हे पाहण्यासाठी उत्सुक्ता आहे.