नवी दिल्ली : भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) विशाल सिक्का यांनी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रमोटर्ससोबत होत असलेल्या मतभेदांमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 


विशाल सिक्का यांच्या जागी युबी प्रवीण राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिक्का यांचा राजीनामा तत्काळ स्वीकारून कंपनीने त्यांना बढती देत त्यांची कार्यकारी उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तर सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर शेअर बाजारात २०० अकांची घसरण झाली असून इन्फोसिसच्या शेअरमध्ये ४ टक्के घट झाली आहे.


इन्फोसिसमध्ये २०१४ पर्यंत सह-संस्थापक असणाऱ्यांनीच कंपनीचं नेतृत्व केलं होतं. पण विशाल सिक्का हे पहिलेच असे सीईओ होते की जे इन्फोसिसचे सह-संस्थापक नव्हते. विशाल सिक्का यांची १ ऑगस्ट २०१४ साली कंपनीच्या सीईओ आणि एमडीपदी नियुक्ती करण्यात आली होती.


दरम्यान, उद्या इन्फोसिसच्या संचालक मंडळाची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत इन्फोसिसनं जाहीर केलेल्या समभाग पुनर्खरेदी अर्थात शेअर्स बायबॅक कार्यक्रमाची रुपरेषा ठरवली जाणार आहे. याच बैकीत बायबॅकची किंमतही ठरवण्यात येईल.