मुंबई : सोमवारी 'व्हिस्तारा'ने त्यांच्या तिसर्‍या अ‍ॅनिव्हरसरीचं औचित्य साधून खास ऑफर जाहीर केली आहे. व्हिस्ताराने ऑल इन्क्लुजिव्ह १०९९ रूपयांमध्ये विमानप्रवास करण्याची संधी दिली आहे.  


काय आहे ऑफर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

९ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी व्हिस्ताराची तिसरी अ‍ॅनिव्हरसरी आहे. यानुसार ऑफरमध्ये इकॉनॉमी क्लास १०९९, प्रिमियम इकॉनॉमी क्लास २५९९  आणि बिजनेस क्लास ७४९९ रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.  


कधी आहे ऑफर  


आज ( 9 जानेवारी) २४ तास  तुम्ही ( रात्री २३.५९)  तुम्ही विमानाची तिकीटं बुक करू शकणार आहात. १७ जानेवारी ते १८ एप्रिल २०१८ दरम्यानची तिकिटं या काळात बुक करण्याची संधी मिळणार आहे. किमान ८ दिवस आधीचं बुकिंग तुम्ही या ऑफरमध्ये करू शकणार आहे. 


कोठे करू शकाल प्रवास ? 


भारतामध्ये २२ ठिकाणी प्रवास करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. यामध्ये गोवा, कोची, नवी दिल्ली, लखनऊ, पोर्ट ब्लेअर, चेन्नई अशा ठिकाणी प्रवास करू शकणार आहेत.  


गेल्या ३ वर्षांमध्ये २२ ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये आठवडाभरात ७०० विमानं आकाशात झेपावतात. आतापर्यंत व्हिस्ताराने ७ मिलियन ग्राहकांना विमानसेवा दिली आहे.