विशाखापट्टणम : विशाखापट्टणममधील आर.आर वेंकटपुरम गावात जवळपास 2.30 वाजता एका कंपनीच्या प्लांटमध्ये विषारी वायूची गळती झाल्याने एका लहान मुलासह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 लोकांची स्थिती गंभीर आहे. 1000हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या विषारी गॅस गळतीमुळे 3 किलोमीटरपर्यंतचा भाग प्रभावित झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आसपासच्या 6 गावांना स्थलांतरित करण्यात आलं आहेत.


स्टायरिन गॅस किती धोकादायक -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- या गॅसचा प्लॅस्टिक, पेंट, टायर यांसारख्या वस्तू बनवण्यासाठी वापर केला जातो.
- हा गॅस शरीरात गेल्यास जळजळ होणं, त्याचा थेट परिणाम केंद्रीय मज्जासंस्थेवर होतो.
- स्टायरिन गॅस लहान मुलं, श्वासासंबंधी त्रास असलेल्या रुग्णांसाठी अतिशय धोकादायक आहे.


 


विशाखापट्टणमध्ये कंपनीत मोठी वायूगळती; सहा जणांचा मृत्यू


 


या गॅसचा शरीरावर मोठा परिणाम होऊ शकतो. या गॅसच्या संपर्कात आल्यास व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होणं, शरीरावर रॅशेस, डोळ्यांमध्ये जळजळ, उलटी आणि चक्कर सारखं होणं अशा समस्या होऊ शकतात. या गॅसमुळे व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक बोलावली आहे. वायू गळतीमुळे बेशुद्ध पडलेल्यांमध्ये लहान मुले आणि अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. गॅस गळती थांबली असून शरीरावरील या वायूचा परिणाम कमी करण्यासाठी भरपूर पाणी पिणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे.