10वी नंतर तुमच्यासमोर `या` व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पर्याय, नोकरी मिळण्याच्या संधी अधिक
Vocational Courses After 10th: व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे काय? त्याची आवश्यकता काय आहे? 10वी नंतर कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम करता येतात? हे सर्व जाणून घेऊया.
Vocational Courses After 10th: दहावीचा निकाल लागल्यावर विद्यार्थी करिअरच्या विविध मार्ग शोधायला लागतात. बहुतांश विद्यार्थी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स हे पर्याय निवडतात. पण या व्यतिरिक्तही तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. वाढती स्पर्धा लक्षात घेता दहावीनंतर तुम्हाला कौशल्य सुधारणे आवश्यक आहे. यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे तुम्ही वळू शकता. सध्याच्या वाढत्या स्पर्धा लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याने काही ना काही व्यावसायिक अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे. हे अभ्यासक्रम केल्याने तुमची कौशल्ये विकसित होतील. तसेच भविष्यासाठी तुमच्याकडे चांगला करिअरचा पर्याय असेल. सध्याच्या जगात व्यावसायिक अभ्यासक्रमांना खूप महत्त्व प्राप्त झालंय. यासाठी सर्वात आधी व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे काय? त्याची आवश्यकता काय आहे? 10वी नंतर कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम करता येतात? हे सर्व जाणून घेऊया.
व्यावसायिक अभ्यासक्रमांचे फायदे
सध्या इंडस्ट्रीमध्ये हॉस्पिटॅलिटी, हेल्थ केअर, ऑटो मोबाईल, ॲनिमेशन, फॅशन आणि टेक्सटाईल इत्यादी क्षेत्रांना खूप मागणी आहे. या क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. यासाठी तुम्हाला दहावीनंतर एक आवडता विषय निवडावा लागेल. व्यावसायिक अभ्यासक्रम करिअर वाढीसाठी खूप उपयुक्त ठरतात. व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणादरम्यान, विद्यार्थ्यांना व्यावसायिक मदत तर मिळतेच, सोबत व्यावसायिक नैतिकतेचे ज्ञान देखील मिळते. भविष्यात याचा खूप उपयोग होतो.
तुमच्याकडे एखाद्या गोष्टीचे व्यावसायिक कौशल्य असेल कंपनी तुम्हाला सहजपणे कामावर ठेवेल आणि तुम्हाला चांगला पगारही मिळतो. कमी वेळात अनेक कोर्स करून तुम्ही तुमचा CV अधिक मजबूत बनवू शकता. 3 महिने किंवा 6 महिने कालावधीचे देखील व्यावसायिक अभ्यासक्रम असतात. हे करुन तुम्हाला तुमचे करिअर निवडणे सोपे जाते.
10वी नंतरच्या वोकेशनल/डिप्लोमा अभ्यासक्रमांची यादी:
हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट कोर्स
डिप्लोमा इन फ़ूड अॅण्ड बेवरेज सर्विस
डिप्लोमा इन बेकरी अॅण्ड कंफेक्शनरी
डिप्लोमा इन क्राफ्ट कोर्स इन फूड प्रोडक्शन
डिप्लोमा इन कुकरी
डिप्लोमा इन हाउस किपिंग
डिप्लोमा इन रेस्टॉरंट अॅण्ड काउंटर सर्व्हिस
डिप्लोमा इन हॉटेल रिसेप्शन अॅण्ड बुक किपिंग
हॉटेल अॅण्ड हॉस्पिटॅलिटी ऑपरेशन मॅनेजमेंट
10 वी नंतर इंजिनीअरिंग आणि औद्योगिक अभ्यासक्रमांची यादी
डिप्लोमा इन आर्किटेक्चरल असिस्टंटशिप
डिप्लोमा इन ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग
डिप्लोमा इन केमिकल इंजिनीअरिंग
सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा
डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स (मायक्रोप्रोसेसर)
डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
डिप्लोमा इन फॅशन डिझाईन
डिप्लोमा इन फूड टेक्नॉलॉजी
डिप्लोमा इन गारमेंट टेक्नॉलॉजी
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी डिप्लोमा
डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी
डिप्लोमा इन इंटिरियर डिझाइन आणि डेकोरेशन
डिप्लोमा इन लेदर टेक्नॉलॉजी
डिप्लोमा इन लेदर टेक्नॉलॉजी (फूटवेअर)
लायब्ररी अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी डिप्लोमा
डिप्लोमा इन लेदर टेक्नॉलॉजी
मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग)
डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग (टूल अँड डाय)
मरीन इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा
मेडीकल अॅण्ड लेबॉरीटी टेक्नोलॉजी डिप्लोमा
डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी
प्रोडक्शन अॅण्ड इंडस्ट्रियल टेक्नोलॉजी डिप्लोमा
डिप्लोमा इन टेक्सटाईल प्रोसेसिंग
टेक्सटाइल डिझाइनिंग
फॅशन डिझायनिंग
डिप्लोमा इन हेयर एंड स्किन केयर
ब्यूटीशियन
इव्हेंट मॅनेजमेंट
ऑफिस मॅनेजमेंट
रुग्णालय आणि आरोग्य सेवा व्यवस्थापन (नर्सिंग)
इंग्रजी कम्युनिकेशन अॅण्ड प्रेझेंटेशन स्किल
स्मेटिक अॅण्ड लाइफस्टाइल प्रोडक्ट डिझाइनिंग
कॅटरिंग मॅनेजमेंट
हे सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम तुम्ही 10वी नंतर कधीही करू शकता. तुमचे औपचारिक शिक्षण पूर्ण नसले तरी या कोर्सच्या मदतीने तुम्ही चांगली कमाई करु शकता.