मुंबई : भारतामध्ये काही महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये Voter ID Card चाही समावेश होतो. निवडणूक आयोगाद्वारा हे ओळखपत्र देण्यात येतं. पण, अनेकदा असं होतं की दिलेल्या फॉर्ममध्ये सर्व माहिती देऊनही ज्यावेळी ओळखपत्र किंवा Voter ID Card हातात येतं तेव्हा मात्र त्यामध्ये काही चुका असतात. (Voter ID Card correction online process)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिंता करण्याची गरज नाही. कारण काही सोप्या पद्धतींनी तुम्ही घरच्या घरी बसूनच Voter ID Card वर झालेल्या चुका सुधारू शकता. 


काय आहे प्रक्रिया? 
- सर्वप्रथम नॅशनल वोटर्स सर्विस पोर्टल किंवा NSVP च्या अधिकृत संकेतस्थळावर जा. इथं Voeter Portal वर क्लिक करा. आता (https://voterportal.eci.gov.in/) वर तुम्ही रिडिरेक्ट व्हाल. 


- इथं नाव आणि पासवर्ड सेचट करुन रजिस्टर करा. आधीपासून तुम्ही इथं खातं सुरु केलं असल्यास लॉगइन करा. 


- यानंतर ‘Correction in Voter Id’ हा पर्याय निवडा. 


- पुढे Correction in the name हा पर्याय निवडा. 


- आता तुम्ही विधानसभा किंवा तुमच्या वॉर्डची निवड करा. यानंतर तुमचं नाव, वय, लिंग आणि इलेक्टोरल रोल पार्ट नंबर द्या. पत्ता न विसरता नमूद करा. 


- पुढच्या पायरीवर तुम्ही गरजेचे पुरावे अर्थात पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा गॅजेटेड डॉक्युमेंट आणि फोन नंबर या गोष्टींची पूर्तता करा. 


- Declartion भरून प्रिव्हू पाहा आणि सबमीट करा. 


- वोटर आयडीमध्ये नाव बदलल्यानंतर याचं स्टेटस पाहण्यासाठी Reference ID तयार असेल. यावर तुम्ही ही प्रक्रिया कुठवर आली आहे ते पाहा.