Voter ID Card Check Online: निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID Card) अनिवार्य आहे. मतदाराची ओळख पटवण्यासाठी हे मतदार ओळखपत्र महत्त्वाचं ठरतं. निवडणूक ओळखपत्राशिवाय आधार कार्डही (Aadhaar Card) बाळगणं अनिवार्य असतं. देशातील अनेक सेवा आणि सुविधांसोबत आधार कार्ड लिंक (Aadhaar Card Link) करण्यात आलं आहे. आता मतदार ओळखपत्रही आधारकार्ड लिंक केलं जात असून त्यादृष्टीने मोहिमही सुरु करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर बोगस ओळखपत्र बनवली जातात, याला चाप बसावा या उद्देशाने केंद्र सरकारने (Central Government) हे पाऊल उचललं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोगस मतदार ओळखपत्र बाद करणार
भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मतदार ओळखपत्र आधारशी लिंक (Voter ID Link With Aadhaar Card) करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. याद्वारे आधार क्रमांक मतदार यादीशी लिंक केला जाणार आहे. तसंच बोगस मतदारांच्या नोंदी काढून टाकण्यासाठी 6B नावाचा फॉर्म जारी करण्यात आला आहे.  या मोहिमेमुळे एकाच मतदाराचं नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त वेळा नोंद झालं असेल तर ते ओळखणं सोप्प होईल. लोकसभेत निवडणूक कायदे (दुरुस्ती) विधेयक मंजूर करण्यात आलं आहे, जेणेकरून आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करता येईल.


असं करा मतदान आणि आधार कार्ड लिंक


- राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलचं अधिकृत पोर्टल NVSP.in सुरु करा
- तुमच्या NVSP खात्यात लॉग इन करा
- लॉग इन केल्यानंतर 'Search in Electoral Roll'वर जा
- मतदार ओळखपत्र शोधण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती अपलोड करा
- तुमच्या आधारकार्डसंबंधातील माहिती अपलोड करा
- तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आलेल्या OTP पडताळणीसह ओळख प्रमाणित करा.
- तुमचं आधार कार्ड तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक झाल्यावर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईलनंबरवर संदेश प्राप्त होईल.


या पद्धतीनेही करु शकता लिंक


- Google Play Store आणि  Apple App Store वरुन  Voter Helpline App डाउनलोड करा
- अॅप उघडल्यानंतर वोटर रजिस्ट्रेशनवर टॅप करा
- इलेक्टोरल ऑथेंटिकेशन फॉर्म (फॉर्म 6बी) वर क्लिक करा आणि तो उघडा
- लेट्स स्टार्टवर क्लिक करा
- आधार कार्डशी जोडलेल्या आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर रजिस्टर करा, त्यानंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा
- तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी भरा आणि Verify वर क्लिक करा
- Yes I Have Voter ID वर क्लिक करा त्यानंतर Next वर क्लिक करा
- तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक (EPIC) एंटर करा, तुमचे राज्य निवडा आणि 'Fetch Details' वर क्लिक करा.
- 'Proceed' पर क्लिक करा
- आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक रजिस्टर करा आणि 'Done'वर क्लिक करा.
- फॉर्म 6B पूर्वावलोकन Page उघडेल. तुम्ही भरलेला तपशील पुन्हा एकदा बारकाईने तपासा आणि तुमचा फॉर्म 6B अंतिम सबमिशनसाठी 'Confirm' वर क्लिक करा.