VVIP हेलीकॉप्टर घोटाळा : दुबईहून आरोपी राजीव सक्सेनाचं भारतात प्रत्यार्पण
व्हीव्हीआयपी हॅलीकॉप्टर प्रकरणातील आरोपी दुबईतील अकाऊंटंट राजीव सक्सेनाला कायदेशीर प्रक्रियेसाठी भारतात आणले जाणार आहे.
नवी दिल्ली : व्हीव्हीआयपी हॅलीकॉप्टर प्रकरणातील आरोपी दुबईतील अकाऊंटंट राजीव सक्सेनाला कायदेशीर प्रक्रियेसाठी भारतात आणले जाणार आहे. सक्सेनाला बुधवारी संध्याकाळी दिल्लीत आणले गेले. दुबईतील अधिकाऱ्यांनी त्याला त्याआधी सकाळीच ताब्यात घेतले होते. मनी लॉंडरिंगच्या आरोपात सक्सेनाला सक्त वसूली संचनालयाकडे सोपवण्यात येणार आहे. दुबईत राहणाऱ्या सक्सेना आणि त्याच्या पत्नीने दुबईतील दोन संस्थेमध्य मनी लॉंडरिंग केल्याचा ईडीचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात सक्सेनाचा उल्लेख करत त्याच्याविरुद्ध नाजामिन वॉरंट काढण्यात आले होते.
जेम्स मिशेल भारतात
याप्रकरणी सहआरोपी आणि कथित मध्यस्थी करणारा ब्रिटीश नागरिक क्रिश्चियन जेम्स मिशेलचे गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये दुबईतून प्रत्यार्पण करुन भारतात आणले होते. तो सध्या न्यायालयिन कोठडीत आहे. ईडीने दुबईत राहणाऱ्या सक्सेनावर याप्रकरणी पाळत ठेवली होती. त्यानंतर चेन्नई विमानतळावरून त्याची पत्नी शिवानी सक्सेनाला ताब्यात घेण्यात आले. ती जामिनावर बाहेर आहे.