मुंबई : लांब पल्ल्याच्या गाडय़ांतून प्रवास करताना रेल्वे मागणीनुसार ट्रेन वाढविण्याच्या योजनेवर काम करीत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या हाती भलीमोठी वेटिंग लिस्ट पडण्याचे प्रकार कमी होणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाने दिली आहे. त्यामुळे ‘वेटिंग लिस्ट’ हा प्रकार पूर्ण नाहीसा होण्याचे वृत्त निराधार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे बोर्डाने काल राष्ट्रीय रेल्वे योजनेचा मसुदा जारी करीत 2024 पर्यंत वेटिंग लिस्टचे तिकीट हा प्रकारच नाहीसा होऊन केवळ कन्फर्म तिकीट मिळेल असे होणार नसल्याचे रेल्वेने म्हटले आहे. याबाबत रेल्वेने स्पष्ट केले आहे की, रेल्वे आपली क्षमता वाढविण्याच्या तयारी करीत आहे. त्यामुळे मागणीनुसार ट्रेन उपलब्ध करता येतील.


त्यामुळे प्रवाशांना तिकिटात मोठी प्रतीक्षा यादी मिळण्याचे प्रमाण आपोआपच कमी होईल असे रेल्वेने म्हटले आहे. जेव्हा सोडलेल्या ट्रेनमध्ये प्रवाशांची मागणी ही उपलब्ध बर्थपेक्षा अधिक असेल तेव्हा वेटिंग लिस्ट ही तरतूद उपयोगी असते. वेटिंग लिस्ट सुविधा कायम असून जी मागणी आणि उपलब्धतेतील चढउतार कमी करण्यासाठी एक बफर म्हणून कार्य करते असे रेल्वेने म्हटले आहे.



  रेल्वेची वेटींग लीस्ट कायम राहणार राहणार असून  मागणीनुसार गाड्यांची संख्या देखील वाढवली जाणार आहे. प्रतिक्षा यादी कमी करण्याचे रेल्वेचे प्रयत्न आहेत. वेटिंग लिस्ट बंद होण्याचं वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे.