बंगळुरु : ऑफीसमध्ये झोपा काढायला येता का? असा प्रश्न तुमच्या बॉसनं कधी विचारलाय का? मात्र आता बंगळुरूतील कंपनीचे कर्मचारी याचं उत्तर अभिमानानं 'हो' असं देऊ शकतील. कारण मालकांनीच आता ऑफिसात झोपा काढण्याची परवानगी दिलीये. नेमकं काय घडलंय हे आपण जाणून घेऊयात. (wakefit solutions startup in bangalore allows employees to 30 minitues nap break during working hours)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुट्टीच्या दिवशी दुपारी झोप काढायची, हा अनेकांचा सर्वात आवडता प्लॅन. मात्र आता टेन्शन घेऊन नका. हे सुख आता ऑफिसमध्येही भोगता येणार आहे. कारण भारतातल्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ऑफिसातच दुपारी झोपेसाठी खास ब्रेक देणार असल्याचं जाहीर केलंय.


त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता कामादरम्यान झोपेचाही आनंद घेता येणार आहे. बंगळुरूमधील वेकफिट सोल्युशन्स या स्टार्टअपनं आपल्या कर्मचाऱ्यांना हे अनोखं गिफ्ट दिलंय. 


ऑफीसमध्येच झोपा काढता येणार


कंपनीनं दुपारी 2 ते अडीचपर्यंत कर्मचाऱ्यांना पॉवर नॅप घेण्याची मुभा दिली आहे.  त्यासाठी कंपनीच्या परिसरात खास व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी 26 मिनिटं झोप घेतली तर कार्यक्षमता 33 टक्क्यांनी वाढत असल्याचा दावा कंपनीनं केलाय. 


त्यामुळे कर्मचाऱ्यांचं आरोग्य जपलं जाईल आणि ते अधिक चांगलं काम करतील, असा विश्वास कंपनीचे सहसंस्थापक चैतन्य रामलिंग गौडा यांनी व्यक्त केला आहे. 


विशेष म्हणजे ही कंपनी निद्रा व्यवस्थापनात काम करते. त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांच्या निद्रा व्यवस्थापनाचा कंपनीनं सर्वात आधी विचार केलाय. याचा खरोखर किती फायदा होणार हे येत्या 2-3 वर्षांतल्या कंपनीच्या बॅलन्स शिटवरून समजेलच.