गायत्री पिसेकर, झी मीडिया, मुंबई: International astronomy day : आज 1 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवस साजरा केला जात आहे. जगभरामध्ये हा दिवस वर्षातून दोन वेळा साजरा केला जातो. एकदा स्प्रिंग म्हणजेच साधारण एप्रिल-मेमध्ये (वसंत ऋतू) आणि एकदा फॉल म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात (शरद ऋतू) हा दिवस साजरा केला जातो.  कारण शक्यतो या कालावधी आकाश साफ असतं. खगोलप्रेमींनी यादिवशी आवर्जून आकाशाचं निरीक्षण करून विश्वातील खगोलीय चमत्कार पाहावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो.


खगोलशास्त्र म्हणजे काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खगोलशास्त्र म्हणजे पृथ्वी या गृहगोलाच्या, वातावरणाच्या पलीकडे असलेल्या विश्वातील प्रत्येक गोष्टीचा अभ्यास. त्यामध्ये सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे जे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. तसेच याव्यतिरिक्त दुर्बिणी किंवा इतर उपकरणांनी दिसणार्‍या ऑबजेक्टच्या अभ्यासाचा समावेश आहे. दूरवर दिसणारी आकाशगंगा, अगणित दिर्घिका, अलीकडे फोटो कॅप्चर केलेले ब्लॅक होल्स, नेब्युला, धुमकेतू, एस्टेरॉईड बेल्ट आणि धूलीकण अंतराळातील या सगळ्याच गोष्टीचा अभ्यास खगोलशास्त्रात करतात. 


खगोलशास्त्राचे 2 प्रकार


  • ऑर्ब्झवेशन अॅस्ट्रोनॉमी (Observational astronomy): दुर्बिणी आणि कॅमेऱ्याच्या सहाय्याने रात्रीच्या अंधारात अंतराळाचा अभ्यास करणं

  • सैद्धांतिक खगोलशास्त्र (Theoretical astronomy): सर्व निरीक्षण आणि डेटाच्या आधारे 

  • अंतराळातील ऑब्जेक्ट कसे कार्य करतात याचं विश्लेषण, मॉडेल करून सिद्धांत मांडणे.


खगोलशास्त्राच्या मुख्य 3 शाखा


  • एटमॉस्फेरिक सायन्स (Atmospheric science) : वातावरण आणि हवामानाचा अभ्यास

  • एक्सोप्लॅनेटोलॉजी  (Exoplanetology) - सौर मंडळाच्या बाहेरील विविध ग्रहांचा अभ्यास

  • ग्रहांची निर्मिती (Planetary formation) - सौर मंडळाच्या निर्मिती आणि उत्क्रांतीचा अभ्यास


अॅस्ट्रोनॉमर (Astronomer) होण्यासाठी कोणता अभ्यासक्रम निवडावा लागतो?


संशोधन खगोलशास्त्रज्ञ होण्यासाठी भौतिकशास्त्र किंवा खगोलशास्त्रात (doctorate degrees in physics) डॉक्टरेट पदवी असणं आवश्यक आहे. 12वी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र (Physics/Applied Physics) घेऊन B.Sc पदवी पूर्ण करा. पुढे तुम्ही भौतिकशास्त्रात मास्टर डिग्री M.Sc करू शकता. 


करिअरच्या संधी


  • वेधशाळेत (observatory) नोकरीची संधी मिळू शकते.  निवासी खगोलशास्त्रज्ञाच्या भूमिकेत वेधशाळा जनतेशी संवाद साधण्याची संधी देते. एखाद्या विशिष्ट क्षेत्रांवर पुस्तक किंवा संशोधनपर पेपर लिहिणे. खगोलशास्त्रासंबंधी प्रदर्शन भरवणे आदी कामाचे स्वरूप असते.

  • एअरॉस्पेस आणि कंम्प्युटर सायन्स इंडस्ट्री (aerospace or computer science industry) खगोलशास्त्रातील शैक्षणिक क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रात काम करण्याचा पर्याय या इंडस्ट्री मिळू उपलब्ध होतो.  खगोलशास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञांसह थेट कार्य करण्याची संधी मिळू शकते.


स्पेस एजन्सी (space agency) 


नासा (NASA), इस्रो (ISRO), कॅनडियन स्पेस एजन्सी (Canadian Space Agency), युके(UK Space Agency) इसा(Israel Space Agency) यासारख्या स्पेस एजन्सीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता.  


इस्रो (ISRO) मध्ये शास्त्रज्ञ (Scientist) किंवा अभियंता (Engineer) म्हणून नोकरी मिळवण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएससी B.Sc. फर्स्ट क्लास असणं आवश्यक. (निवड केवळ लेखी परीक्षेतील गुणांवर आधारित असेल. कौशल्य चाचणी ही केवळ पात्रता स्वरूपाची असते.) तसेच इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात. त्यावर ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो.