मुंबई : गुजरातमध्ये एक महिला कॉन्स्टेबलने आपली ड्युटी करणं चांगलच महागात पडलं आहे. कारण तिने मंत्र्यांच्या मुलाला प्रश्न विचारले आहेत. सध्या सोशल मीडिया महिला कॉन्स्टेबर सुनीता यादव यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुनीता यादववर मंत्र्याच्या मुलाशी बेशिस्तपणे वागल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणाची गुजरात पोलीस चौकशी करत आहे. हा आरोप गुजरातचे आरोग्यमंत्री कुमार कानानी यांनी लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी रात्री १०.३० वाजता मंत्र्यांचे समर्थक मास्क न लावता फिरत होते. कारण या संपूर्ण परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. तेव्हा कॉन्स्टेबलने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. महिला कॉन्स्टेबलने या प्रकरणात त्यांना प्रश्न विचारला की,'कर्फ्यू काळात तुम्ही मास्क न लावता का फिरत आहेत?'
 
या प्रसंगानंतर समर्थक घाबरले. त्यावेळी त्यांनी मंत्र्याच्या मुलांना फोन लावला. त्यानंतर थोड्यावेळात मंत्र्याचा मुलगा मंत्र्यांची गाडी घेऊन पोहोचला. गाडी आमदारांची असल्याचं लक्षात आलं. मात्र या महिला कॉन्स्टेबलने न घाबरता आपलं कर्तव्याचं पालन केलं. 



या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये सुनिता यादव मंत्र्याच्या मुलाला प्रश्न विचारत आहे. आमदार नसताना त्यांची गाडी घेऊन का फिरवली जात आहे. यावर मंत्र्यांचा आरोप आहे की, कॉस्टेबल महिला माझ्या मुलाशी बेशिस्तपणे वागत आहेत. या प्रकरणाची पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहे. 


महिला कॉन्स्टेबलने आपला राजीनामा दिला आहे. पोलिसांकडून पाहिजे तसा पाठिंबा न मिळाल्यामुळे ती कंटाळली आहे. तर दुसऱ्या बाजूला सुरतचे पोलीस कमिश्नर राजेंद्र ब्रम्हभट्टने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसपी सीके पटेल यांना सांगितलं आहे.