VIDEO: बंद नोटांच्या बदल्यात मिळवा नव्या नोटा, पाहा कुठे आणि किती मिळतील पैसे
चलनातून बाद करण्यात आलेल्या जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तुमच्याकडे आहेत? मग, काळजी करु नका कारण आजही जुन्या नोटा बदली करुन दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली : चलनातून बाद करण्यात आलेल्या जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तुमच्याकडे आहेत? मग, काळजी करु नका कारण आजही जुन्या नोटा बदली करुन दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २०१६ मध्ये नोटबंदी केली. ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानंतर जुन्या नोटा बदली करण्यासाठी सरकारने एक सीमा ठरवली. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आजही जुन्या नोटा बदली केल्या जात आहेत.
कोण करतं हे काम?
नोट बदली करण्याची संपूर्ण प्रक्रिया केवळ १५ मिनिट ते अर्धा तास या दरम्यान होते. यामध्ये कुठलीही बँक किंवा ऑफिस काम करत नाही. तर केवळ एक मिडलमॅन (मध्यस्थ) काम करतो.
हा मिडलमॅन तुमच्याकडून जुन्या नोटा घेतो आणि तात्काळ नव्या नोटा देतो. मात्र, या नोटांच्या बदल्यात तुम्हाला केवळ सहा टक्के रक्कमच मिळते. म्हणजेच जर तुम्ही एक लाख रुपयांच्या जुन्या नोटा बदली करण्यासाठी दिल्या तर तुम्हाला केवळ सहा हजार रुपयेच मिळतील. हा धक्कादायक खुलासा द क्विंट या न्यूज पोर्टलसोबत एका मिडलमॅनने केला आहे.
जोगिंदर सिंह (बदललेलं नाव) ने सांगितलं की, मी एका क्षणात जुन्या नोटा बदलू शकतो. मात्र, हे काम ३१ मार्च पर्यंतच करता येणार आहे
धक्कादायक व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
नोट कशा बदलल्या जातात?
या प्रश्नाचं उत्तर देताना जोगिंदरने सांगितलं, "माझ्या ओळखीतले आजही हे काम करतात. जर तुम्ही मला एक लाख रुपये दिले तर त्या बदल्यात तुम्हाला सहा हजार रुपये मिळतील. ही ऑफर केवळ ३१ मार्च पर्यंतच आहे. माझ्या ओळखीचे बँकेत जातात आणि त्या ठिकाणी जुन्या नोटा बँकेत देतात. ही लोक बँकर्ससाठी काम करतात. मला माहित नाही की बँकेतून या नोटा कुठं जातात. पण, जुन्या नोटा बँकेत जातात हे नक्की".